येत्या चार वर्षात मुंबई चित्रपट नगरीचा कायापालट करणार - मुख्यमंत्री

मुंबई : मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था संपूर्ण विकसित झाली असून मुंबई चित्रनगरीचा येत्या चार वर्षात संपूर्णपणे कायापालट करण्यात येईल. चित्रपट निर्मिती क्षेत्रासाठी आवश्यक निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत आवश्यक सुविधांसह चित्रपट नगरीचा विकास असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फिक्की फ्रेम्स - अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन' कार्यक्रमात अभिनेते अक्षय कुमार यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सिनेमाच्या आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात मुंबईचे महत्त्वपूर्ण स्थान असून येथे चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था विकसित झाली आहे. सळसळत्या उत्साहाने भारावलेल्या या क्षेत्रातील निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत आवश्यक संकलन, चित्रीकरण याचे संबंधित तंत्रज्ञानाचा विस्तार झाला आहे. मुंबई शहरालगत कर्जत, मीरा-भाईंदर असे अनेक ठिकाणी चित्रीकरणासाठी स्टुडिओ निर्माण झाले आहेत. विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या या चित्रपट उद्योगाला आधुनिक रूप देण्याचे काम येत्या काळात चित्रनगरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मराठी चित्रपटांना चांगले दिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,आशयघन व दर्जेदार मराठी चित्रपट आणि मराठी नाटके दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून त्यातील प्रयोगाशीलता आणि अभिनव निर्मितीमुळे सक्षम ठरत आहे. मराठी सिनेमागृह न मिळण्याचा काळ मागे पडला असून आता एकाच वेळी दोन दोन मराठी सिनेमे प्रदर्शित होतात आणि हाउसफुल होतात असे सांगून नटरंग, सखाराम बाईंडर यासह आत्ताचा दशावतार या चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी येथे चित्रपट मुहूर्तमेढ रोवली.

आजपर्यंतच्या काळात असंख्य हिंदी व मराठी चित्रपटांनी भावनाप्रधान कथानकातून मनामध्ये विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. सर्व सामान्य दर्शकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आत्ताच्या पिढीस ( gen - z) भावणारे व आवडणारे चित्रपट येण्यासाठी प्रयत्न केले जावेत. यातून ते चित्रपटांशी जोडले जातील. चित्रपट हे उत्कृष्ट समाजमाध्यम आहेत, सायबर गुन्हे प्रकारांवर आळा घालण्यासाठी अशा विषयांवर आधारित कथेवर आधारित सिनेमे निर्माण केले जावेत. सायबर क्राईम, सेक्सटॉर्शन, सायबर फ्रॉड अशा बाबत जनसामान्यांना जागृत करणाऱ्या चित्रपटांतून हे घडू शकेल. यासाठी सायबर क्राईम विरोधात ‘डिजिटल वॉरफेअर’मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले.
Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही