मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्राप्त झालेल्या प्रभाग रचना २०२५ च्या संदर्भातील सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई महापालिका निवडणुकीकरता २२७ प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बनवून राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. यावर सुमारे ४८८ हून अधिक हरकती व सूचना मागण्यात आल्या होत्या. यावर हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर यावर आयुक्तांनी तीन दिवस सुनावणी घेत त्यातील पात्र सूचनांचा स्वीकार करत त्यानुसार प्रभाग रचनेत बदल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्त हरकत व सूचनांपैंकी सुमारे ६६ टक्के हरकती व सूचना मान्य केल्या आहे. त्यानुसार सहा प्रभागांमधील रचनेत बदल करण्यात आला आहे. यामध्ये पूर्व उपनगरांती घाटकोपरमधील एन विभागातील प्रभाग १३० आणि कुर्ला एल विभागातील प्रभाग १६९मध्ये मध्ये बदल करण्यात आला आहे.
तर पश्चिम उपनगरांमध्ये चार प्रभागांच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. ज्यामध्ये आर मध्यमधील प्रभाग १३ आणि १४ प्रभागांमधील रचनेत बदल करून १३ प्रभागांत सुसुत्रता आणली आहे. तर पी उत्तरमधील प्रभाग ३४मधील मतदार केंद्र ३२मध्ये सुधारीत करण्यात आले आहे, याशिवाय प्रभाग ४२ आणि ४३च्या प्रभाग रचनेमध्ये सुसुत्रता आणली गेली आहे. तसेच एच पूर्वमधील प्रभाग ९५ हा सुधारीत करण्यात आला आहे. ज्यातील काही मतदान केंद्र हे प्रभाग ९६ मध्ये समाविष्ठ झाले होते.
https://mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCElectio2025या लिंकवर ही प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे