मूळ किंमतीपेक्षा ३५% घसरणीसह शेअरचे लिस्टिंग
मोहित सोमण:ग्लॉटिस लिमिटेड (Glottis Limited) या आयपीओत गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी बरबाद झाले आहेत. ३०७ कोटींचा हा आयपीओ (IPO) २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर कालावधीत बाजारात दाखल झाला होता. ज्यामध्ये १.२४ कोटीचे फ्रेश इशू शेअरची विक्री करण्यात आली असून ऑफर फॉर सेल (OFS) साठी १.१४ कोटी शेअर उपलब्ध होते. आज कंपनीचा शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) झाला आहे. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आ हे. आयपीओतील मूळ प्राईज बँड किंमत असलेल्या १२९ रूपये प्रति शेअर तुलनेत कंपनीचा शेअर ३४.८८% घसरत ८४ रूपयांवर खुला झाला होता. ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.
आयपीओला एकूण २.१२ पटीने चांगले सबस्क्रिप्शन मिळाले होते ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडून १.४७ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.८४ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ३.०८ वेळा मिळाले होते. याशिवाय कंपनीने अँकर गुंतव णूकदारांकडून ५५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारला होता जो इश्यूपूर्वी संस्थात्मक पाठिंब्याचे लक्षण आहे. या आकडेवारीमुळे किमान मध्यम लिस्टिंग नफ्याची आशा निर्माण झाली होती, परंतु वास्तवात मात्र गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे.
चेन्नई येथे स्थित, ग्लोटिस ही एक बहुमॉडेल एकात्मिक लॉजिस्टिक्स (Multimodel Integrated Logistics) सेवा प्रदाता आहे,जी ऊर्जा पुरवठा साखळी उपायांमध्ये विशेषज्ञ आहे आर्थिक वर्ष २५ साठी त्यांनी असाधारण कमाईसह अहवाल दिलेल्या कालावधीत त्यांच्या वरच्या आणि खालच्या पातळीवर (Top and bottom line) मध्ये वाढ नोंदवली होती. सध्याचे कंपनीचे बाजार भांडवल ११९२ कोटी रुपये आहे.कंपनी आपल्या आयपीओतून मिळालेल्या निधीचा वापर खेळत्या भांडवल गरजेसाठी (Working Capital R equirements), दैनंदिन कामकाजासाठी (General Corporate Purposes) साठी करणार असल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले होते. आर्थिक वर्षात कंपनीच्या महसूलात ८९% वाढ झाली होती तर करोत्तर नफा ८१% वाढला होता. मात्र सूचीबद्ध होताच कंप नीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.