चिकन वडा पाव

साहित्य :


२५० ग्रॅम बोनलेस चिकन खिमा
१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
१ लहान कांदा बारीक चिरलेला
१ टेबलस्पून कसुरी मेथी
२-३ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून धने पावडर
१/२ टेबलस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून एव्हरेस्ट चिकन मसाला
१ टीस्पून गरम मसाला
चवीप्रमाणे मीठ
१ कप बेसन पीठ
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून ओवा
चवीप्रमाणे मीठ
लागले तेवढे पाणी
तळण्यासाठी तेल
हिरव्या चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना हिरवी मिरची, लसूण, लिंबू, मीठ
टोमॅटो सॉस किंवा केचप
लादी पाव



कृती :


प्रथम बेसन पीठ भिजवून घ्यावे. एका बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन, त्यात हळद, लाल तिखट, मीठ, हातावर चोळून ओवा घालावा. सर्व कोरडं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडे थोडे पाणी घालत, वड्याला जसे पीठ भिजवतो तसे भिजवून घ्या. चिकन खिमा एका बाऊलमध्ये घेऊन त्यात आलं लसूण पेस्ट,धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर सर्व घालून घ्या. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणे त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण, लिंबू व मीठ, पाणी घालून हिरवी चटणी वाटून घ्या. कढईत वडे तळता येतील इतकं तेल घेऊन गॅसवर गरम करायला ठेवून द्या. बेसन पीठ हाताने व्यवस्थित फेटून घ्या. चिकनचा गोळा घेऊन पिठात घोळवून, तेलामध्ये सोडा. दोन्ही बाजूने लालसर होतील असे, मध्यम आचेवर वडे तळून घेणे. लादी पाव घेऊन सुरीने मधोमध कापून घेणे. पावाच्या एका बाजूला हिरवी चटणी आणि दुसऱ्या बाजूला लाल चटणी किंवा केचप लावून घ्या. पावात वडा ठेवून गरमागरम खायला द्या.


सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे
Comments
Add Comment

योगसाधकांसाठी सुबोध श्लोक

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके योग तत्त्वज्ञान आणि योगाची आठ अंगं प्रामुख्यानं संस्कृत ग्रंथांमध्ये सांगितली आहेत.

थाई स्प्रिंग रोल - इंडियन स्टाईल!

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे थाई चव आणि भारतीय मसाले एकत्र आले की तयार होतात इंडियन स्टाईल झणझणीत आणि कुरकुरीत

कलाविश्वातील सृजनी

कर्तृत्ववान ती राज्ञी : दीप्ती भागवत वैशाली गायकवाड नमस्कार मैत्रिणींनो, बघता बघता मार्गशीर्ष महिन्याचे दोन

अनुभवा वेदनामुक्त मातृत्व

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील प्रसूती ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची, आनंददायी पण त्याचवेळी

थंडीमध्येही चेहरा ठेवा चमकदार!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर हिवाळ्यातील थंड आणि कोरडी हवा आपल्या त्वचेचे नैसर्गिक मॉइश्चरायझेशन हिरावून घेते,

कंदमुळांचं कालवण

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे आता महाराष्ट्रात सगळीकडे थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात शरीराला उबदार