कोकणात वन्यप्राणी रस्त्यांवर...!

कोकणात पूर्वी सह्याद्री पट्ट्यात अनेक गुणकारी औषधी वनस्पती होत्या; परंतु रानमोडीच्या वाढीने या औषधी वनस्पती कुठे दिसेनाशा झाल्या आहेत. रानमोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगलात पसरत असताना आजच्या घडीला या रानमोडीची वाढ रोखण्यासाठी शासनाच्या वनविभागाकडून आजवर कोणतेही प्रयत्न देखील झाले नाही. शासनाच्या वनविभागाला जंगलातील रानमोडी रोखण्यासाठी खास उपाययोजना कराव्या लागतील तरच जंगल वाचवता येईल. शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईने खरे तर कधीच नुकसान भरून येत नाही. त्यामुळे कोकणातील शेतकरी बागायतदार खरे तर या वन्यप्राण्यांच्या रोजच्या त्रासाला फारच कंटाळला आहे; परंतु ‘रोज मरे त्याला कोण रडे’ याप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांच्या या व्यथेला कोणतेच उत्तर नाही...


एकीकडे कोकणात कोसळलेल्या पावसाने शेतीच काय होणार असा प्रश्न घेऊन चिंताक्रांत असलेल्या शेतकऱ्याला अनेक समस्या आणि प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. निसर्गाच चक्र विचित्र पद्धतीने सतत बदलत आहे. त्या बदलणाऱ्या ऋतुचक्राची उपाययोजना कुणाच्याच हातात नाही. या बदलाला सामोरे जाण्याचा प्रयत्न कोकणातील सर्वसामान्यजन करत आहे. या अचानक येणाऱ्या संकटाला आणि उद्भवणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्याचा प्रयत्न होत आहे. समुद्रातील स्थितीही ठिक नाही. वादळी-वाऱ्याच्या शक्यतेने समुद्रातील मासेमारीवर कुटुंबांची उदरनिर्वाह करणाऱ्यांनाही काही सूचत नाही अशीच काहीशी विचित्र स्थिती आहे. समुद्र खवळलेला असतो. यामुळे मच्छीमारांना मासेमारीसाठी जाता येत नाही. गेल्या पंधरवड्यात तीन-चार वेळा समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मासेमारीसाठी गेलेल्या नौका किनाऱ्यावर आणाव्या असं विचित्र ऋतुचक्र झालेलं आहे. साहजिकच त्याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आहे. यामुळे कोकणातील शेतकरी असेल किंवा मच्छीमार असेल त्यांच्यापुढे समस्या आहेतच. हे सर्व असतानाच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा लोकवस्तीतील वावर फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोकणात जरी फलोद्यान लागवड योजनेतून आंबा, काजू यांच्या बागायतीचे क्षेत्र वाढले असले तरीही कोकणात बेसुमार जंगलतोडीचं प्रमाणही फार मोठ्याप्रमाणात होत आहे. काही वर्षांपूर्वी मोठ-मोठी वर्षानुवर्षांची जंगले कोकणात होती. शासकीय जमिनीतही जुनाट जंगली झाड होती; परंतु शासनाच्या वनविभागाच्या आशीर्वादानेच ही जुनी जंगल वनसंपत्ती नष्ट करण्याचे प्रमाणही वाढले आहे. बेसुमार जंगलतोड होत असताना जंगलांमध्ये सर्वत्रच रानमोडी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या रानमोडीने जंगलातील वन्यप्राण्यांना उपयुक्त असणारी झाडांची वाढही खुंटली आहे. अलीकडे तर कोकणात जंगल शोधावी लागतील अशी आजची स्थिती आहे. याचं कारण बेसुमार जंगलतोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रातील झाडांची तोड होत असतानाच शासकीय जंगलातील झाडही तोडण्यात येतात. मोठ-मोठी सागवानसारख्या किमती झाडांची होणाऱ्या तोडमुळे कोकणातील जंगलामध्ये झाडकमी आणि रानमोडी अधिक जंगलांना रानमोडीनेच वेढा घातला आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये अशी स्थिती आहे. रानमोडी मोठ्या प्रमाणात जंगलातून पसरल्याने जंगलातील अनेक औषधी वनस्पतीही नष्ट झाल्या आहेत. कोकणात पूर्वी सह्याद्री पट्ट्यात अनेक गुणकारी औषधी वनस्पती होत्या; परंतु रानमोडीच्या वाढीने या औषधी वनस्पती कुठे दिसेनाशा झाल्या आहेत. रानमोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगलात पसरत असताना आजच्या घडीला या रानमोडीची वाढ रोखण्यासाठी शासनाच्या वनविभागाकडून आजवर कोणतेही प्रयत्न देखील झालेले नाही. शासनाच्या वनविभागाला जंगलातील रानमोडी रोखण्यासाठी खास उपाययोजना कराव्या लागतील तरच जंगल वाचवता येईल. नाहीतर कोकणातील सर्वच जंगलांमधील सर्वसाधारणपणे रानमोडीची वाढ झपाट्यानेच होत आहे. या जंगलातील रानमोडी वाढल्याने जंगलातील वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये येत आहे. कोकणात अनेक भागात वाघ दिवसाढवळ्या रस्त्यांवर दिसत आहे. काही गावातील घराशेजारी वाघांची डरकाळी ऐकू येऊ लागली आहे. रहदारीच्या मार्गांवर जो वाघ पूर्वी कधीतरी घनदाट जंगलात दिसायचा तो वाघ गावातून, शहरातील कॉलनीत फिरताना दिसतो. गवारेड्याचा उपद्रव तर अखंड कोकण अनुभवतोय. कोकणातील एकही जिल्हा असा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये गवारेड्याने शेती-बागायती पायाखाली घातली नाही. कळपानेच गवारेडे गावात येतात आणि गावात येऊन गवारेडे शेतकऱ्यांवर हल्ले करताना दिसतात. हत्तींचा वावर कोकणातील गोवा राज्याच्या व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात फिरतात. ज्या भागात हत्ती फिरतात त्या भागातील शेती बागायती नष्ट झालेली असते. अनेक गावच्या शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या या मानवी वस्तीतील येण्याने शेतीच सोडून दिलेली. कोकणात अनेक उदाहरणे आहेत. माकडांनी तर थेट घरातच प्रवेश घेतला आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेती, बागायतीत जाण्यापूर्वी जर घरात जेवण बनवून ठेवलेले असेल तर माकड कळपानी घरात येतात आणि घरात बनवून ठेवलेले अन्नपदार्थ उलटे करताता. किंवा त्याचा विध्वंस करतात. माकडांच्या घरात येण्याला जसा शेतकरी कंटाळला आहे तसाच माकडांच्या नारळी, पोफळीच्या बागायतीत येऊन कोवळ्या नारळांचा विध्वंस माकड करताना दिसून येतात. वनविभागाकडे यासंबंधी शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावरही वनविभागाचे अधिकारी फक्त हतबलता व्यक्त करतात. शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईने खरे तर कधीच नुकसान भरून येत नाही. त्यामुळे कोकणातील शेतकरी बागायतदार खरे तर या वन्यप्राण्यांच्या रोजच्या त्रासाला फारच कंटाळला आहे; परंतु ‘रोज मरे त्याला कोण रडे’ याप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांच्या या व्यथेला कोणतेच उत्तर नाही. शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना मर्यादा आहेत. त्या पलीकडे जाऊन कोणालाच काही करता येत नाही. अशी स्थिती आहे. कोकणातील जंगलांमध्ये जंगलात रहाणाऱ्या पशु-पक्ष्यांना खाण्यासारख काही उरल नाही. केवळ यासाठीच आज पूर्वी जंगलामध्ये असणारे हे प्राणी केवळ दूरवरच्या आवाजाने त्या भागातील जंगलात आवाजावरून तो प्राणी पक्षी आहे हा अंदाज वर्तविला जायचा; परंतु गेल्याकाही वर्षातील बेसुमार जंगलतोडीने कोकणचा सृष्टी सौंदर्याने नटलेला खरा आकर्षक चेहराच विद्रुप करण्यात आला आहे. होणारी जंगलतोड वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मूक सहमतीनेच होत असल्याने कुंपनच चोर असणाऱ्या रखवालदाराने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. आज रस्त्यांवर दिसणारे हे वन्यप्राणी मानवी वस्तीतील घरापर्यंत पोहोचलेच आहे. भविष्यात कोकणातील वाडी-वस्तीत फिरणेही सामान्य शेतकऱ्यांना मुश्किल होईल याची जाणीव आणि भान राखणे आवश्यक आहे; परंतु आपल्याच मस्तीत वावरणाऱ्या आपणाला मानवी वस्तीत येऊन वन्यप्राणी शेतकऱ्यांना जाणीव करून सातत्याने देत आहेत. सुधारणा करायची की नाही हे आपणच ठरवायचे आहे. आज हमरस्त्यांवर दिसणारे हे प्राणी गल्ली-बोळातही उभे असलेले दिसतील. दोष त्या वन्यप्राण्यांचा नाही तर दोष आपला आहे. त्यांच्या वस्तीत आपणच अतिक्रमण केलय. तर ते आपल्या वस्तीत आले तर गैर काय?
नाही का...?


-संतोष वायंगणकर
Comments
Add Comment

दसरा - दिवाळी अन् रेल्वेचे वेटिंग तिकीट

गणेशोत्सवाची धामधूम संपताच मुंबईकरांचे लक्ष आता दसरा आणि दिवाळीच्या सणांकडे वळले आहे. देशभरात हे दोन्ही सण

"ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट"ला खड्ड्यांचे ग्रहण

पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी हब म्हणून ओळखली जाते. यामध्ये ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' समजल्या

अवकाळीने मोडले दक्षिण महाराष्ट्राचे कंबरडे

महाराष्ट्रातील दक्षिण भाग, विशेषतः सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात

कोकणातील शेतकऱ्यांची नवी उभारी

राज्यात शेतकऱ्यांची जी शेतीची विदारक चित्र माध्यमांवर येतात तशी स्थिती कोकणातही अनेकवेळा आली आहे. येत आहे. अगदी

अजित पवारांची विदर्भात पक्षबांधणी?

शरद पवारांची खरी ताकद ही पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येच राहिलेली आहे. उर्वरित महाराष्ट्रात कुठे

विदर्भ-मराठवाडा जोडणारा रेल्वे प्रकल्प संथ गतीने

मराठवाडा-कर्नाटक जोडणारा नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे प्रकल्प यापूर्वीच मंजूर झाला आहे. या रेल्वे मार्गासाठी