लवकरच रणबीर कपूर आणि विकी कौशल एका जबरदस्त सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . येत्या ईद ला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित लव्ह अँड वॉर हा अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील काही सीन्सचं शूटिंग झालं असून लवकरच शूटिंग पूर्ण करण्यात येईल. यासोबतच करण जोहर चा नव्या वर्षात येणाऱ्या एका सिनेमाची सुद्धा चर्चा सुरु आहे, कारण या नव्याकोऱ्या सिनेमातून आलिया भट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रिपोर्ट नुसार करण जोहरच्या या नव्या सिनेमात आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचसोबत चर्चा चालू आहे ती आलिया सोबत हिरो म्हणून मुख्य भूमिकेत कोण दिसणार याची , रणबीर कपूर आणि विकी कौशल यापैकी एकाची निवड केली जाणार आहे असे बोलले जात आहे. पण त्यात एक ट्विस्ट असा आहे कि आलिया भट, विकी कौशल , रणबीर कपूर संजय लीला भन्साळी च्या आगामी लव्ह अँड वॉर सिनेमात एकत्र झळकणार आहेत.
त्यामुळे करण जोहर सिनेमात हे तिघे एकत्र दिसतील कि कोणा एकाचीच निवड केली जाईल ही गोष्ट प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणार. यापूर्वी आलिया ने विकी कौशल सोबत राजी , आता येणारा लव्ह अँड वॉर या सिनेमात काम केले आहे, आणि ब्रम्हास्त्र या सिनेमात पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि आलीया एकत्र दिसले होते.