पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त


पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील मेट्रोला तंबाखूजन्य पदार्थांचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. अवघ्या आठवडाभरात मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर सर्वाधिक १२.४६ किलो सुट्टी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुटख्याच्या ९८६ पुड्या, गायछापच्या १३८९ पुड्या, तर १३२५ लाइटर आणि माचिस या वस्तू आढळून आल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, बेशिस्त प्रवाशांना वारंवार आव्हान करूनही स्थानकांच्या भिंती, सरकते जिने, बाहेरील भिंती रंगवून ठेवल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्वच्छ, सुलभ आणि आरामदायी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनपुढे (महामेट्रो) नवीन आव्हान उभे राहिले आहे.


पुण्यातील पीसीएमसी ते स्वारगेट (पर्पल लाईन) या मार्गावर आणि वनाज ते रामवाडी (ब्ल्यू लाईन) या मार्गावरील मेट्रो प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. आरामदायी आणि सुखकर प्रवास होत असून महामेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही बेशिस्त प्रवाशांमुळे सुंदर, स्वच्छ मेट्रोची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे.


सार्वजनिक ठिकाणी तसेच मेट्रो, रेल्वेमध्ये ज्वलनशील पदार्थांची वाहतूक तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वर्ज्य आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही हे पदार्थ हानिकारक असताना, अनेक प्रवाशांकडून मेट्रो स्थानकांवर, सरकत्या जिन्यांवर पान, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन भिंती, परिसर अस्वच्छ करण्याचे प्रकार केले जात आहेत.

Comments
Add Comment

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर