मुंबई खास प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजूरी दिलेली असून अंतिम करण्यात आलेली प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्राप्त झालेल्या प्रचाग रचना २०२५ च्या संदर्भातील सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना प्रदान करण्यात आली. त्यानुसार मुंबई महापालिका निवडणुकीकरता २२७ प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बनवून राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. यावर हरकती व सूचना मागण्यात आल्या होत्या. यावर ४८८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. यावर आयुक्तांनी तीन दिवस सुनावणी घेण्यात आली त्यांच्या त्यांचे निवारण करत त्यानुसार काही बदल करत त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. या अंतिम २२७ प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त झाली आहे.
अंतिम प्रभाग रचना कुठे आणि कशी पहाल
https://mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCElectio2025 या लिंकवर ही प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.