Gold Silver Rate: सोने प्रति डॉलर ३९०० औंस या जागतिक उच्चांकावर चांदीही महागली ! 'हे' आहे जागतिक विश्लेषण

मोहित सोमण: जागतिक पातळीवर सोने इतिहासात पहिल्यांदाच ३९०० औंस प्रति डॉलर या नव्या उंचीवर पोहोचल्याने सोन्यात वैश्विक संदर्भात रेकोर्ड ब्रेक वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार,भारतीय बाजारात २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर १३७ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर १२५ रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर १०३ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्याचे प्रति ग्रॅम किंमत २४ कॅरेटसाठी १२०७७ रूपये, २२ कॅरेट सोन्यासाठी ११०७० रूपये, १८ कॅरेटसाठी ९०५८ रूपयां वर पोहोचली आहे.उपलब्ध माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १३७० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२५० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १०३० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२०७७० रूपये, २२ कॅरेटसाठी ११०७०० रूपये, १८ कॅरेटसाठी ९०५८० रुपयांवर पोहोचला आहे. भारतीय सराफा बाजारात मुंबईसह इतर महत्वाच्या शहरात सोन्याचा प्रति ग्रॅम दर १२०७७ रूपये, २२ कॅरेटसाठी ११०६० रूपये, १८ कॅरेटसाठी ९०५८ रूपये आहे.


जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.३७% वाढ झाली आहे. तर जागतिक मानक (Standard) किंमत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.३३% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३९ ३८.५१ औंसवर गेली आहे. युएस बाजारातील शटडाऊनचा जोरदार फटका कमोडिटीत बसल्याने कमोडिटी दरपातळीत दबाव निर्माण झाला आहे. कमालीच्या अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी सोन्याच्या गुंतवणूकीत अधिक प्राधान्य दिल्याने वाढलेल्या स्पॉट मागणी मुळे सोने महागले आहे. तसेच भारतीय बाजारातील रूपयांच्या सातत्याने घसरणीमुळे सोन्याच्या उच्च दरपातळीला आणखी आधार मिळाला होता. यापूर्वी बोफाने (Bank of America BoFA) म्हटले आहे की अनेक तांत्रिक निर्देशक (Technical Indicators) असे सूचित करतात की सोन्याच्या किमती ४००० डॉलर प्रति औंसच्या पातळीच्या जवळ येत असल्याने सोन्याची शक्तिशाली तेजी कमी होत चालली आहे.'या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही मौल्यवान धातूंसाठी तेजीचे सेटअप सादर केले होते' असे बोफा म्हणाले होते 'सोने त्याच्या त्रिकोणाच्या रचनेपासून उंचावल्याने व्यापक तेजीत सामील झाले' असेही बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


या हालचालीमुळे,त्यानंतर गाठलेले महत्त्वाचे वरचे लक्ष्य अनलॉक झाले परंतु आता बँक चेतावणी देते की अनेक वेळेच्या चौकटीतील तांत्रिक सिग्नल आणि परिस्थिती सोने ४००० डॉलर प्रति औंसच्या जवळ येत असताना तेजीच्या थकव्याचा इशारा देतात' असे बँके ने म्हटले होते. बोफाच्या मते, जागतिक सोने “सलग सात आठवड्यांनी वर आहे, हा एक नमुना आहे जो ऐतिहासिकदृष्ट्या अल्पकालीन कमकुवतपणापूर्वीचा आहे.' असे म्हटले. युएस फेड व्याजदरात किरकोळ कपात झाल्यानंतर युएस बाजारातील गुंतवणूकदा रांना किरकोळ दिलासा मिळाला असल्याने बाजारात गेल्या काही दिवसांपासून डॉलरसह कमोडिटीत मोठी रॅली झाली आहे.याशिवाय भारतास मात्र रुपयात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतलेल्या गुंतवणूकीचा फटका बसल्याने मुल्यांकन कमी झा ले होते. अशातच भारतीय बाजारात वाढलेली सणासुदीच्या काळातील खरेदी व भारतातील वाढलेली ईपीएफ गुंतवणूकीत झालेली वाढ या दोन्ही कारणांमुळे बाजारातील सोन्यात आज प्रचंड वाढ झाली. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi C ommodity Exchange MCX,) मध्ये संध्याकाळपर्यंत सोने निर्देशांकात १.४१% वाढ झाली. त्यामुळे सोने दरपातळी ११९७८० रूपयांवर गेली.


सोन्याच्या टेक्निकल पोझिशनवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'कॉमेक्स गोल्डने ३९०० डॉलर्सच्या वर जाऊन ३९५० डॉलर्सपर्यंत वाढ केल्याने सोन्याचा भाव १७५० रुपयांनी वा ढून ११९८५ ० रुपयांवर सकारात्मक व्यवहार झाला. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या मागणीमुळे आणि जागतिक भावनेमुळे सुरू असलेली तेजीमुळे किमतींना आधार मिळत आहे, तर रुपयाची कमकुवतता देशांतर्गत ताकद वाढवत आहे. अल्पावधीत जोपर्यं त ११४००० डॉलर्सचा महत्त्वाचा आधार आहे तोपर्यंत सोने वरचढ राहण्याची अपेक्षा आहे. या आठवड्याचे लक्ष फेड चेअर पॉवेल यांचे भाषण, फेड बैठकीच्या मिनिटांचे प्रकाशन आणि बेरोजगारी आणि नॉन-फार्म पेरोलवरील महत्त्वपूर्ण अमेरिकन डेटावर असेल, या सर्वांमुळे किमतींमध्ये अस्थिरता येऊ शकते.'


चांदीतही वाढ !


आज चांदीच्या दरातही वाढ झाली असल्याने चांदी महागली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीचा प्रति ग्रॅम दर रूपयांनी वाढला असून प्रति किलो चांदी १००० रुपयांनी महागली आहे. त्यामुळे चांदीची प्रति ग्रॅम किंमत १५६ रूपये प्रति किलो किंमत १५६ ००० रूपयांवर पोहोचली आहे. संध्याकाळपर्यंत चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकातही ०.२४% वाढ झाली आहे. भारतीय सराफा बाजारात मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १५६० रूपये, प्रति किलो दर १५६००० रूपयांवर गेले आहेत. चांदीच्या बाबतीतही दिवाळी पूर्वीच्या काळात मोठ्या प्रमाणात मागणीत वाढ झाल्यासह इलेक्ट्रिक वाहनासह चांदीच्या औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने चांदी सातत्याने महागत आहे.

Comments
Add Comment

गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने झाले जागे, गॅसच्या सुरक्षित वापरासाठी घेतला 'असा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत गेल्या काही दिवसात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: आयटी, फायनांशियल सर्विसेस शेअर जोरावर बाजार सलग तिसऱ्यांदा उसळले मात्र ते खरेच उसळले का पडले? जाणून घ्या टेक्निकल व फंडामेटल विश्लेषण

मोहित सोमण:सकाळची किरकोळ वाढ बाजारात कायम राहिल्याने आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ