सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्याशी बातचीत केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी भारताचे सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्याशी बातचीत केली. आज सुप्रीम कोर्ट परिसरात त्यांच्यावर झालेला हा हल्ला प्रत्येक भारतीयाला चीड आणणारा आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांसाठी कोणतेही स्थान नाही. ही लाजिरवाणी बाब आहे.


 


दरम्यान, सरन्यायाधीश यांच्यावर जोडा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याला बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) ने तात्काळ निलंबित केलं आहे. निलंबनाच्या काळात त्यांना कोणत्याही न्यायालय, ट्रिब्युनल किंवा अधिकरणात हजर राहण्याची, वकिली करण्याची किंवा केस चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही.


बीसीआय ने राकेश किशोर यांचा वकिलीचा परवाना रद्द केला असून, या प्रकरणी अनुशासनात्मक कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यांना १५ दिवसांत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांनी ही कारवाई का सुरू ठेवू नये हे स्पष्ट करावं लागेल. त्यांच्या उत्तरानंतर आणि तपासाच्या आधारावर कौन्सिल योग्य तो निर्णय घेईल.


दुसरीकडे, सीजेआय बी. आर. गवई यांनी स्वतः राकेश किशोरविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ सूत्रांनुसार,सीजेआय यांनी रजिस्ट्री अधिकाऱ्यांना सांगितले की, या घटनेकडे उपेक्षेने पाहावं आणि दुर्लक्षित करावं.जेवणाच्या सुट्टीत, सीजेआय न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल, सुरक्षा प्रमुख व इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सतर्कता वाढवण्यावर चर्चा केली.


वकील राकेश किशोर याने सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न केला आणि जोरात ओरडला, “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही!” त्याला तत्काळ कोर्ट परिसरात ताब्यात घेण्यात आलं. मात्र काही वेळातच दिल्ली पोलिसांनी त्याची कोर्टातच सुटका केली. हा जोडा न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्याकडे गेला पण त्यांना लागला नाही. नंतर किशोरने कबूल केलं की, हा हल्ला सीजेआय गवई यांच्यावरच होता, आणि न्यायमूर्ती चंद्रन यांची माफीही मागितली.

Comments
Add Comment

भारतीय सेनेच्या ताफ्यात कामिकाझे ड्रोन

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सेना आपल्या लढाऊ क्षमतेत सातत्याने वाढ करत असून, त्याचाच भाग म्हणून सेनेने

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा

दिल्लीसह अनेक राज्यांत थंडीचा कहर

अनेक भागांत पावसाची शक्यता नई दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये कडक थंडी आणि धुक्याचा

भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद

अमेरिकन डाळींवर ३०% टॅरिफ; अमेरिकन शेतकरी अस्वस्थ

ट्रम्प यांना अमेरिकी सिनेटरांचे पत्र नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर जड टॅरिफ लादले असले तरी भारतानेही अमेरिकन

संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे ११४ राफेल खरेदीचा प्रस्ताव

लढाऊ विमानांच्या कमतरतेवर तोडगा नवी दिल्ली : फ्रान्सकडून आणखी राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या दिशेने