कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा उत्साहाच्या भरात किंवा चुकीच्या माहितीमुळे लोक काही अशा चुकांमध्ये अडकतात, ज्या त्यांच्या शरीराला फायद्याऐवजी नुकसान पोहोचवू शकतात.


नियमित शारीरिक हालचाल ही संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असते, मग ते हृदय असो, मेंदू, हाडं किंवा स्नायू. व्यायामामुळे मानसिक आरोग्यही सुधारते आणि ऊर्जा वाढते. त्यामुळे सध्या बरेच लोक फिटनेसकडे वळले असून, कार्डिओला प्राधान्य देताना दिसतात. पण हा व्यायाम करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.



कार्डिओ करताना होणाऱ्या सामान्य चुका


१) अतिरिक्त वेगाने सुरुवात करणे


खूप जण व्यायामाची सुरुवात करताच थेट जास्त वेगाने धावू लागतात किंवा हाय-इंटेन्सिटी वर्कआउट करतात. पण हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. वेग हृदयगतीच्या ७०-८०% पातळीवर अचानक पोहोचल्याने थकवा, दम लागणे किंवा इतर त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे कार्डिओ करताना गती हळूहळू वाढवणं आवश्यक आहे.


२) नेहमी एकाच प्रकारचा कार्डिओ करणे


रोजच एकच व्यायाम, जसं की फक्त ट्रेडमिलवर धावणे असे केल्याने शरीराला सवय होते आणि परिणाम कमी होतो. शिवाय कंटाळाही येतो. त्यामुळे धावणे, सायकल चालवणे, जलद चालणे किंवा झुंबा यासारख्या वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश करा.


३) अत्याधिक कार्डिओ करणे


"जास्त केल्याने जास्त फायदा" ही संकल्पना व्यायामात लागू पडत नाही. काही जण तासन् तास कार्डिओ करतात, पण त्यामुळे स्नायूंवर ताण येतो आणि त्यांची झीज होते. व्यायामाच्या तीव्रतेनुसार ३०-४० मिनिटांपर्यंत कार्डिओ पुरेसं असतं.


४) फक्त कार्डिओवर लक्ष केंद्रित करणे


काही लोक फक्त कार्डिओ करून वेट ट्रेनिंगला दुर्लक्ष करतात. पण वेट ट्रेनिंगसुद्धा आवश्यक आहे. ते मसल्स मजबूत करतात, हाडं बळकट करतात आणि शरीराचा एकूण स्टॅमिना वाढवतात. त्यामुळे आठवड्यातून किमान २-३ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं फायदेशीर ठरतं.


कार्डिओ करताना योग्य पद्धत वापरणं हेच शरीरासाठी फायद्याचं ठरतं. गती नियंत्रण, विविधता, संतुलित वेळ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचं योग्य मिश्रण यामुळे तुम्हाला हवेसे फिटनेस परिणाम मिळू शकतात, तेही दुखापतीचा धोका टाळून!

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी