यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यात येतो. कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा. या पौर्णिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी देवी निद्रेतून जागी होते. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी युद्ध करून थकते आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत झोपी जाते ,अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची आराधना केली जाते.



कोजागिरी पौर्णिमेचे महत्व


कोजागिरी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो याच दिवशी माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाली. या दिवशी भगवान श्रीकृष्ण वृंदावनात रासलीला रचतात अशी मान्यता आहे


२०२५ मध्ये कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे ?

हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा यंदा सोमवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:२३ वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार ७ ऑक्टोबर सकाळी ९:१६ वाजता संपणार आहे. त्यामुळे तिथी नुसार ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल



मुहूर्त


कोजागिरी पौर्णिमा : शुभ मुहूर्त ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:४५ पासून, ७ ऑक्टोबर रोजी रात्री १२:३४ पर्यंत असेल


कोजागिरीच्या पूजेसाठी ४९ मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे


चंद्रोदय : ६ ऑक्टोबर , सायंकाळी ५:२७ वाजता होईल


या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो


या रात्री चंद्र आपल्या १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे औषधी अमृतमयी मानली जातात. दूध हे चंद्र प्रकाशात ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. चंद्राची किरणे दुधात मिसळतात आणि दूध गुणकारी होते आजारी असलेल्या माणसाला ते प्यायला दिल्याने आजार बरे होण्यास मदत होते, असे सांगतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.



भारतात वेगवेगळ्या प्रांतात कोजागिरी कशी साजरी केली जाते.


भारतातील अनेक प्रांत ही रात्र आपापल्या पद्धतीने साजरी करतात. गुजरातमध्ये गरबा खेळतात, हिमाचलमध्ये जत्रा भरते , राजस्थानमध्ये शुभ्र पांढरी वस्त्रे नेसून चांदीचे दागिने घालून चंद्राची पूजा केली जाते ओडिशा मध्ये गजलक्ष्मीची पूजा केली जाते.

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर

मोंथा चक्रीवादळाचे १२ बळी

अनेक भागात पूरसदृश स्थिती तेलंगणा : मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे

भारत - अमेरिकेत १० वर्षांचा संरक्षण करार

क्वालालंपूर : भारत आणि अमेरिकेने संरक्षण क्षेत्रात पुढील दहा वर्षांसाठी सहकार्य वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण

"वर्ल्ड वेगन डे" का साजरा केला जातो जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस जागतिक वर्ल्ड वेगन डे म्हणून साजरा केला जातो. जगभरातील नागरिकांनी

दिल्ली विमानतळावर भारतीय महिलेकडे मिळाला ९७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा!

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील महिला प्रवाशांनी गांजा तस्करी

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट