तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद


छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, गैरसोय टाळण्यासाठी दोन दिवसांकरिता व्हीआयपी आणि देणगी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


मंदिर संस्थानच्या प्रशासक तथा तहसीलदार माया माने यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रकानुसार, यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे. या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसह देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होतात.विशेषतः महोत्सवाच्या अखेरीस, सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ आणि मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणेच भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने मंदिर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


या निर्णयानुसार, दिनांक ६ आणि ७ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवशी ५०० रुपयांचे व्ही.आय.पी. संदर्भ दर्शन आणि १००० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेमंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जरी दोन विशेष दर्शन प्रकार बंद असले तरी, सर्वसामान्य भाविकांसाठी नियमित धर्मदर्शन (विनाशुल्क), मुखदर्शन आणि ३०० रुपयांचे सशुल्क देणगी दर्शन पास पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. तसेच, घाटशीळ पार्किंग मार्गावरील वाहतूकही नियमितपणे सुरू राहील.सर्व भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दर्शनाचे नियोजन सुरळीत पार पडावे आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.


Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग