मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश


ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मंत्री नितेश राणे यांनी फार मोठा सुरुंग लावला. उबाठाचे तालुकाप्रमुख असलेले मंगेश लोके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबतच वैभववाडी तालुक्यातील उबाठाच्या अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी खांबाळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अशा शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वैभववाडी तालुक्यातील मुख्य भाजपात आला आहे.


या पक्षप्रवेशा दरम्यान मंगेश लोके यांनी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन हा प्रवेश करत आहोत. विकास करण्याची क्षमता मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात आहे. वैभववाडी तालुका आणि खांबाळे गाव विकासाच्या टप्प्यावर पुढे जावा, आणि म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचे लोक यांनी जाहीर केले.


यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बॅंक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रदेश कार्यकारणी सदस्या संध्या तेरसे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा कार्यकारणी सदस्य दिगंबर पाटील, बंड्या मांजरेकर, देवानंद पालांडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना