झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशी झाली. घटनास्थळाजवळच एका यॉटमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीने या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त केला आहे . त्याने गायकाला विष देण्यात आले असा दावा केला आहे.आसामसह संपूर्ण भारताला आपल्या आवाजाने वेड लावणारा झुबीन गर्ग याचा पाण्यात बुडून मृत्यूची बातमी ऐकताच त्याच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

पण अद्यापही त्याच्या मृत्यूचं कोडं सुटलेलं नाही. गुंता वाढत आहे. झुबीन गर्ग याचा मृत्यू अपघात नाही तर खून आहे अश्या चर्चांना उधाण आले आहे. झुबीन गर्ग याचा मृत्यू १९ सप्टेंबर रोजी सिंगापूर मध्ये लॅझरस आयर्लंड जवळ झाला. त्याच्या मृत्यूनंतर एसआयटी स्थापन झाली आहे. ही एसआयटी झुबीनच्या मृत्यूची चौकशी करत आहे.तपास सुरू झाला आणि १ ऑक्टोबर रोजी झुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा याला अटक करण्यात आली. तो दीर्घ काळापासून झुबीनसाठी काम करत होता.

रिमांड नोट मध्ये काय आहे


५२ वर्षाचा झुबीन गर्ग याचा सिंगापूर मध्ये लॅझरस आयर्लंड जवळ नॉर्थइस्ट इंडिया फेस्टिवल season ४ दरम्यान आउटिंग करतेवेळी मृत्यू झाला. मृत्यू हा बुडून झाला असे सांगण्यात आले होते. पण एआयटीने सादर केलेल्या रिमांड नुसार संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली. एसआयटी रिमांड नोटमध्ये झुबीनच्या को सिंगर अमृता प्रभा महंत आणि अभिनेत्री निश्चित गोस्वामी यांचाही उल्लेख आहे.झुबीन गर्गच्या जवळच्या व्यक्ती बंडमेंट शेखर ज्योती गोस्वामी यांनी आरोप केला की मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि फेस्टिवल आयोजक श्यामकाणु महंत यांनी गायकाला विष दिलं. हा कट खूप आधीपासून रचण्यात आला होता म्हणून मुद्दामून एका विदेशी ठिकाणाची निवड केली गेली. शेखर ज्योती यांनी असे सांगितले कि यॉटवर मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांनी दारू पुरवली. आणि कोणताही व्हिडीओ शूट करण्यास नकार दिला शिवाय जबरदस्तीने कार्यक्रमाची सगळी सूत्रे स्वतःच्या हातात घेतली.

नाक आणि तोंडातून फेस


साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार झुबीन गर्ग हे उत्कृष्ठ पोहणारे होते . त्यामुळे बुडून मृत्यू होणं शक्य नाही . झुबीनच्या शेवटच्या क्षणी ते श्वास घेण्यासाठी झगडत होते. नाकातोंडातून फेस येत होता.

तपासाला सुरुवात


एसआयटीने झुबीनच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. सर्व शक्यता तपासण्याचे काम सुरू आहे.
Comments
Add Comment

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास!

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता व्ही. शांताराम यांच्या पत्नी, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री संध्या

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

गरोदरपणानंतर रुबिना दिलीकचा आत्मविश्वास डगमगला!

मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या

तर त्या पुरस्काराला काही अर्थ नाही: राणी मुखर्जी

एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या राष्ट्रीय पुरस्कारानंतरच्या भावना व्यक्त केल्या. ती

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल