'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमसाठी असणारा 'सपोर्ट' (Support) लवकरच बंद केला जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२५ ही विंडोज १०च्या समर्थनाची अंतिम तारीख असणार आहे. या तारखेनंतर, विंडोज १० वापरणाऱ्या डिव्हाईसला कोणतेही नवीन सुरक्षा अपडेट्स, फीचर्स किंवा तांत्रिक मदत मिळणार नाही. विंडोज १० वापरणाऱ्या सर्व युजर्ससाठी ही एक महत्त्वाची सूचना आहे. आपले डिव्हाईस आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी विंडोज ११ कडे जाण्याचा किंवा ESU प्रोग्रामचा विचार करणे आवश्यक आहे, असे कंपनीने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टने सर्व युजर्सना सोयीसाठी आणि डेटा सुरक्षिततेसाठी विंडोज ११ (Windows 11) ऑपरेटिंग सिस्टमवर हळूहळू अपग्रेड करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, विंडोज ११ मध्ये, पूर्वीच्या व्हर्जनच्या तुलनेत सुरक्षा-संबंधित समस्यांमध्ये ६२ टक्के कपात झाली आहे आणि कामाचा वेग ५०टक्के पर्यंत वाढतो.
Comments
Add Comment

धक्कादायक! खेळणे समजून उचलले आणि स्फोट झाला, पाकिस्तानमध्ये तीन मुलांचा मृत्यू

कराची: पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंध प्रांतातील काश्मिरमध्ये रॉकेट स्फोटात तीन मुलांचा

व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार

हजारो लोक बेघर; ९० जणांचा मृत्यू हनोई : गेल्या काही आठवड्यांपासून व्हिएतनाममध्ये सातत्याने मुसळधार पाऊस सुरु

Pakistan: पेशावरमध्ये फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरीच्या मुख्यालयावर हल्ला

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत पुन्हा एकदा दहशतवादाच्या रडारवर आला आहे.२४ नोव्हेंबरला सोमवारी

अमेरिकेच्या आडकाठीनंतरही जी-२० घोषणापत्र मंजूर

शिखर परिषदेने परंपरा मोडली जोहान्सबर्ग : अमेरिकेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकूनही जागतिक नेत्यांनी संयुक्त

एलियन्स पृथ्वीवर येणार, एआय अनियंत्रित होणार, जगात विनाशकारी युद्ध होणार आणि बरंच काही... काय सांगते बाबा वेंगांची भविष्यवाणी

यावर्षाचा उत्तर काळ सुरू झाला असून नवीन वर्षाच्या स्वागताला काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे २०२६ वर्ष कसे असेल?

दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू

दुबई : दुबई एअर शो दरम्यान शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. या अपघातात विंग