मोहित सोमण: पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणात आयपीओ (Initial Public Offerings IPO) बाजारात येत आहेत. या मुख्य (Mainline) व एसएमई (लघु मध्यम SME) श्रेणीतील आयपीओ बाजारात दाखल होत असल्याने गुंतवणूकदारांसाठी आयपीओ ची रांग लागणार आहे. या भाऊगर्दीत तब्बल २८००० कोटींचे आयपीओ बाजारात दाखल होत आहे. मुख्य (Mainboard) आयपीओत ६ ते ८ ऑक्टोबरमध्ये टाटा कॅपिटल, एल जी इलेक्ट्रॉनिक्स ७ ते ९ ऑक्टोबर, अनंतम हायवेज ट्रस्ट ७ ते ९ ऑक्टोबर, रूबीकॉ न रिसर्च लिमिटेड ९ ते १३ ऑक्टोबर कालावधीत बाजारात येणार असून एसएमई श्रेणीत ७ ऑक्टोबरपासून ९ ऑक्टोबरपर्यंत मित्तल सेक्शन लिमिटेड कंपनीचा आयपीओ येणार आहे. पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी खूप सुमारे पाच कंपन्यांचे प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) प्राथमिक बाजारात येणार असल्याने एकत्रितपणे २८००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उभारली जाईल हे आता स्पष्ट झाले आहे.
याव्यतिरिक्त आगामी काळात २९ कंपन्या - मेनबोर्ड आणि एसएमई - देशांतर्गत एक्सचेंजेसमध्ये पदार्पण करतील. टाटा समूहाची नॉन- बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) टाटा कॅपिटल, ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान त्यांचा आयपीओ जारी करेल - ज्याचे उद्दिष्ट १५५०० कोटी रुपये उभारणे आहे. टाटा कॅपिटलची प्रारंभिक शेअर विक्री या वर्षीची आतापर्यंतची सर्वात मोठी असणार आहे. हा आयपीओ २१ कोटी नवीन शेअर्स आणि विक्रीसाठी ऑफर (OFS) म्हणून २६.५८ कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. टाटा समूहा च्या कंपन्यांचा निश्चित प्राईज बँड ३१० ते ३२६ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
दिग्गज कंपनी व दक्षिण कोरियास्थित एलजीची भारतीय उपकंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने (LG Electronics India) ७-९ ऑक्टोबर रोजी ११६०७ कोटी रुपयांचा फ्लोटिंग आयपीओ जाहीर केला आहे. हा आयपीओ पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर इश्यू आहे ज्यामध्ये दक्षिण कोरियास्थित मूळ कंपनी १०८०-११४० रुपयांच्या प्राईज बँडसह आयपीओतील मैदानात उतरणार आहे. माहितीप्रमाणे, कंपनी आयपीओत १०.१८ कोटी शेअर्स ऑफलोड करणार आहे. भांडवल उभारणीच्या बाबतीत या दोन्ही कंपन्या सर्वाधिक योगदान देतील आणि त्या २ कंपन्यांचा एकत्रित इश्यू आकारच २७१०७ कोटी रुपये असेल.शिवाय, अनेक एसएमईचे आयपीओ पुढील आठवड्यात उघडतील. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया ही प्रमुख गृह उपकरणे आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्समध्ये आघाडीची कंप नी आहे. कंपनी भारत आणि परदेशातील बी२बी आणि बी२सी ग्राहकांना त्यांची उत्पादने विकते.
हे वर्ष आयपीओ बाजारासाठी मोठे ठरत आहे. रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, कंपन्यांनी ७४ मेनबोर्ड ऑफरिंगद्वारे (सप्टेंबरपर्यंत) ८५००० कोटी रुपये उभारले आहेत.ऑक्टोबरमध्ये गती वाढत आहे, कारण आगामी लिस्टिंगमुळे एकूण उभारलेल्या रकमेचा इतिहा सात तिसऱ्यांदा १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला जाईल. यापूर्वी, २०२१ आणि २०२४ मध्ये,आयपीओ बाजाराने हा उंबरठा ओलांडला होता. २०२१ मध्ये कंपन्यांनी ६३ आयपीओद्वारे १.१९ लाख कोटी रुपये उभारले, तर २०२४ मध्ये ९१ सुरुवातीच्या ऑफर मधून हा आकडा १.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला.
औषध कंपनी रुबिकॉन रिसर्चची (Rubicon Research Limited) सुरुवातीची शेअर विक्री ९ ऑक् टोबर रोजी बोलीसाठी (Bidding) खुली होईल.आयपीओ इश्यू १३ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. बीएसई व एनएसईवर हा शेअर सूचीबद्ध (Listed) १६ ऑ क्टोबरला होणार आहे. माहितीनुसार, कंपनीने प्राईज बँड ४६१ ते ४८५ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला आहे.प्रवर्तक (प्रमोटर) जनरल अटलांटिक सिंगापूर आरआर लिमिटेडद्वारे ५०० कोटी किमतीचे इक्विटी शेअर्स आणि एकूण ८७७.५ कोटी ओएफ एस ऑफर करून आयपीओचे उद्दिष्ट १३७७.५० कोटी रुपये उभारण्याचे आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इश्यूचे उद्दिष्ट कर्ज परतफेड आणि अजैविक वाढ आणि कॉर्पोरेट सामान्य उद्देशांसाठी (General Corporate Purposes) निधी देणे समाविष्ट आहे .रुबिकॉन रिसर्च ही एक औषधी फॉर्म्युलेशन फर्म आहे जी संशोधन आणि विकास आणि नवोपक्रमावर जोरदार लक्ष केंद्रित करते. ३० जून २०२५ पर्यंत, रुबिकॉन रिसर्चकडे यूएस एफडीएने मंजूर केलेल्या ७२ सक्रिय अॅब्रेव्हिएटेड न्यू ड्रग अॅप्लिकेशन (ANDA) आणि न्यू ड्रग अॅप्लिकेशन (NDA) उत्पादनांचा पोर्टफोलिओ होता. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ६६ व्यावसायिक उत्पादने समाविष्ट आहेत, ज्यांचे यूएस जेनेरिक फार्मास्युटिकल मार्केट आकार (Market Size) २४५५.७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे, ज्यापै की रुबिकॉन रिसर्च लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले आहे. ३० जून २०२५ पर्यंत, कंपनीकडे १७ नवीन उत्पादने यूएस एफडीए एएनडीए मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि ६३ उत्पादने विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत.
माहितीनुसार कंपनीचा महसूल इयर ऑन इयर बेसिसवर ४९% वाढला असून यापूर्वी करोत्तर नफा (PAT) ४८% वाढला आहे. मार्च २०२५ मधील १२९६.२२ कोटी उत्पन्नाच्या तुलनेत हे जून २०२५ मध्ये ३५६.९५ कोटींवर घसरले होते. तर करोत्तर नफा मार्च २५ मधील १३४.३६ कोटींच्या तुलनेत घसरण जून महिन्यात ४३.३० कोटींवर पोहोचला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४५५० (३० शेअर) रूपयांची गुंतवणूक अनिवार्य असणार आहे. अनंतम हायवेज ट्रस्ट आयपीओ (Anantam Highways Trust L imited IPO) बाजारात ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान दाखल होणार आहे. अल्फा अल्टरनेटिव्ह्ज अनंतम हायवेज ट्रस्ट, एक रोड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) चा आयपीओ लाँच करून ४०० कोटी उभारण्याचा विचार करत आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओसाठी प्राईज बँड ९८ ते १०० प्रति युनिट शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. हा इश्यू ७ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत बोलीसाठी (Bidding) उपलब्ध असेल त्यानंतर १७ ऑक्टोबरला बीएसई व एनएसईत सूचीबद्ध होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओसाठी उभारलेला निधी विशेष उद्देश वाहने (SPVs) आणि सामान्य उद्देशांसाठी कर्ज देण्यासाठी वापरला जाईल. अनंतम हायवेज ट्रस्ट हा एक भारतीय पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट आहे जो रस्ते पायाभूत सुविधांच्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो. हे अल्फा अल्टरनेटिव्ह्ज फंड अँडव्हायझर्स एलएलपी द्वारे प्रायोजित आहे.ट्रस्टकडे सात प्रोजेक्ट एसपीव्हीचा प्रारंभिक पोर्टफोलिओ असेल, ज्याचे एकूण क्षेत्रफळ २७१.६५ किमी असेल, जे पाच राज्ये आ णि एका केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला या आर्थिक वर्षात ६३% महसूल घटला आहे. तर करोत्तर नफा मात्र तब्बल ३५७% वाढला. मार्च २०२५ मध्ये असलेले ९४२.३६ कोटी उत्पन्न जून २०२५ मध्ये २१२.२८ कोटींवर घसरले होते. तर करोत्तर नफा मार्च २०२५ म धील ४१०.६२ कोटींच्या तुलनेत घसरत ६७.८६ कोटींवर पोहोचले.तर मार्च २०२४ मध्ये कंपनीचा नफा १६०.०५ कोटी होता जो ३५७% मार्च २०२५ मध्ये वाढला होता.याशिवाय मित्तल सेक्शन्सचा ५२.९१ कोटी बीएसई एसएमई आयपीओ हा केवळ ३७ लाख शेअ र्सचा संपूर्ण नवीन जारी करण्यात येत आहे. ७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर पर्यंत हा शेअर बिडिंगसाठी खुला राहील. प्राईज बँड प्रति शेअर १३६ ते १४३ रूपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक मर्यादा २ ००० शेअर्स आहे. या ऑफरचे उद्दिष्ट म्हणजे जमीन संपादन, कारखान्याचे बांधकाम आणि उपकरणे खरेदी करणे, खेळत्या भांडवलाच्या गरजा, कर्ज मंजुरी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी भांडवली खर्च करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. मित्तल सेक्श न्स मूलभूत लोखंड आणि स्टील उत्पादने बनवतात. ते राउंड बार, एमएस फ्लॅट बार, अँगल आणि चॅनेलसह सौम्य स्टील सेक्शन आणि स्ट्रक्चरल स्टील उत्पादनांच्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, मार्च २०२४ मधील १६१.६५ कोटींच्या तुलने त उत्पन्न सप्टेंबर २०२४ कालावधीत घसरत ६८.९७ कोटींवर पोहोचले. तसेच मार्च २०२४ मधील १.८९ कोटींच्या तुलनेत वाढत सप्टेंबर २०२४ पर्यंत २.४१ कोटींवर पोहोचला होता.