IDBI Bank Update: आयडीबीआय बँकेच्या व्यवसायात अभूतपूर्व वाढ !

प्रतिनिधी: आयडीबीआय बँक लिमिटेडने शनिवारी आपली आर्थिक माहिती प्रदर्शित केली आहे.त्यातील माहितीनुसार बँकेने दुसऱ्या तिमाहीत अभूतपूर्व कामगिरी केली आहे.बँकेच्या एकूण व्यवसायात इयर ऑन इयर बेसिसवर १२% वाढ नोंदवली आहे जी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ५३३८३९ कोटी रूपये आहे. जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ४७८५४७ कोटी होती.एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण ठेवी वार्षिक आधारावर ९% वाढून ३०३५३१ कोटी झाल्या आहेत, जी गेल्या वर्षी च्या २७७६०२ कोटी होती.बँकेच्या कमी किमतीच्या कासा (CASA) ठेवी १३९०५६ कोटी होत्या, जी सप्टेंबर २०२४ मध्ये १३३६३९ कोटी होती, जी ४% वाढ दर्शवते. सप्टेंबर २०२५ पर्यंत निव्वळ कर्ज (Net Loan) १५% वाढून २३०३०८ कोटी झाले, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत २००९४४ कोटी होते.


पहिल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा (Net Profit) गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.८% वाढून २००७.४ कोटी रूपये झाला आहे,जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील १७१९.३ कोटी होता. या तिमाहीतील निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) २% घ टून ३१६५.८ कोटी झाले. पहिल्या तिमाहीतील निव्वळ व्याज उत्पन्न (NII)३२३२.८ कोटी झाले होते.मार्च तिमाहीतील मालमत्ता गुणवत्तेचा ट्रेंड मिश्रित आहे. या तिमाहीत एकूण एनपीए (NPA) मार्चमधील २.९८% वरून २.९३% वर आला आहे, तर निव्वळ एनपी ए (NPA) मार्चमधील ०.१५% वरून ०.२१% वर आला आहे.आयडीबीआय बँकेचा मालमत्तेवरील परतावा (आरओए) २.०१% पर्यंत वाढला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत १८ बेसिस पॉइंट्सने वाढला. या तिमाहीतील निव्वळ व्याज मार्जिन मागील वर्षी च्या ४.१८% वरून ५० बेसिस पॉइंट्सने कमी होऊन ३.६८% झाला आहे. काल शुक्रवारी आयडीबीआयचा शेअर एनएसईवर ०.२७% उसळत ९२.६० रूपयांवर स्थिरावला आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत २० वर्षीय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला !

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच

'धंगेकर- मोहोळ हा विषय आता संपला, महायुतीमध्ये मतभेद नकोत' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदीमध्ये वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा उभारल्या जातील आळंदी  : कार्तिकी एकादशी आणि त्यानिमित्त होणाऱ्या

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: PSI बदनेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

सातारा : फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,