WORLD SMILE DAY : स्मितहास्य आरोग्याची गुरुकिल्ली

हसताय ना, हसायलाच पाहिजे... म्हणणारा निलेश साबळे असो कि महाराष्ट्राची हास्यजत्रा मधले कलाकार... आपल्या तणावपूर्ण दिवसातून बाहेर काढण्यासाठी खळखळून हसवण्यासाठी येतात रोज रात्री... आपल्या घरी कदाचित हाच काय तोच एकमेव हसण्याचा आधार... आताचं जग पैशाच्या मागे, नोकरीच्या मागे एवढं वेगाने पळतंय की २ मिनिटांची उसंत नाही कोणाला, आणि आजकाल विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे मिळून मिसळून राहणं, एकमेकांच्या आनंदात आनंद साजरे करणं हे मागे राहून गेलंय, मग जॉईन करावे लागतात ते लाफ्टर क्लब. आधी चेहऱ्यावरचं हसू जे अलगद केव्हा केव्हा विनाकारणही यायचं. ते आता मुद्दाम शरीराच्या फायद्यासाठी म्हणून आणावं लागतंय.


आजचा दिनविशेष म्हणजे आज जागतिक स्मितहास्य दिन, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस सेलिब्रेट करण्याची कल्पना 'हार्वे बॉल' या कलाकाराला सुचली. हल्ली सोशल मीडिया वापरताना हमखास हसऱ्या चेहऱ्याची स्माईली वापरतात. या स्माईलीची निर्मिती त्याने केली.... याच हार्वेने स्मितहास्य दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली. तणाव कमी व्हावा आणि सर्वजण उत्साही आणि आनंदी राहावे यासाठीच त्याने स्मितहास्य दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली आणि या संकल्पनेचा पाठपुरावाही केला. लोकांना हसण्याचे महत्त्व समजावले....



चला तर मग जाऊन घेऊ की या हसण्याने आपल्याला शरीराला कोणते फायदे होतात ?


 

शारीरिक फायदे


१. रोगप्रतिकारशक्ती वाढवते : हसण्यामुळे सेरोटोनिन आणि इतर न्यूरोपेप्टाइड्सची निर्मिती होते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि संसर्गजन्य आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.


२. रक्तदाबाचा त्रास कमी होतो : हसण्याने चेहऱ्यावरील स्नायू आकुंचन पावतात. आणि रक्तरप्रवाह वाढतो त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.


३. हसताना शरीर 'एंडॉर्फिन' सोडते, जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते आणि तुम्हाला वेदनांपासून थोडा आराम वाटतो.


 

मानसिक फायदे


१. तणाव कमी होतो : हसण्याने स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात त्यामुळे ताणतणाव, चिंता ही कमी होते


२. मूड सुधारतो : डोकॅमिन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिनसारख्या 'फील-गुड' हार्मोन्सच्या निर्मितीमुळे मूड सुधारतो आणि सकारात्मकता वाढते.


३. नैसर्गिक अँटीडिप्रेसंट : हसणे ही एक नैसर्गिक अँटीडिप्रेसंट म्हणून काम करते, ज्यामुळे नैराश्य कमी होते.


 

सामाजिक फायदे


१. संबंध सुधारतात : हसल्याने नातेसंबंध अधिक घट्ट होतात आणि लोकांमधील सकारात्मक संवाद वाढतो.


२. सकारात्मक ऊर्जेचा प्रसार : हसरे चेहरे आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी आणि उत्साही ठेवतात, ज्यामुळे समाजात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.


३. आकर्षण वाढवते : एक गोड आणि मोकळे हास्य चेहऱ्याची शोभा वाढवते आणि व्यक्तीला अधिक आकर्षक बनवते.


 

एकूणच काय तर हसणे हा मोफत मिळणार नैसर्गिक उपाय आहे. जो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे, आणि हो खरंच लाफ्टर इस बेस्ट मेडिसिन.

Comments
Add Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कोकणाच्या सौंदर्याची भूरळ! विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाचे रत्नागिरीमध्ये शुटींग सुरू

रत्नागिरी: कोकणातील डोंगररांगा, बारमाही वाहणाऱ्या नद्या, स्थापत्य, संस्कृती यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याची

ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! युक्रेन विरूद्ध रशिया युद्धासंबंधी चीनसोबत करणार चर्चा

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास