Sunday, October 26, 2025
Happy Diwali

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 'या' दिवशी १० टक्के राहणार पाणीकपात

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 'या' दिवशी १० टक्के राहणार पाणीकपात

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्‍हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. नियोजनानुसार, मीटर जोडणीचे काम मंगळवारी ०७ ऑक्‍टोबर, बुधवार दिनांक ०८ ऑक्‍टोबर आणि गुरूवारी ०९ ऑक्‍टोबर २०२५ रोजी दररोज दुपारी १२.३० ते ०३.०० वाजेपर्यंत म्‍हणजेच अडीच तास केले जाणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतांश विभागांचा पाणीपुरवठा सलग तीन दिवस प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे मंगळवार ७ ऑक्‍टोबर ते गुरूवार ०९ ऑक्‍टोबर २०२५ असे तीन दिवस १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्‍तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच, पूर्व उपनगरांतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात संपूर्ण परिसरात १० टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. पूर्व उपनगरांतील एल विभाग (कुर्ला पूर्व),  एन विभागात विक्रोळी, घाटकोपर पश्चिम व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागाात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात १० टक्‍के पाणी कपात लागू राहणार आहे.

या परिसरातील नागरिकांनी उपरोक्त तीन दिवसांच्‍या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्या भागात असेल पाणीकपात

ए विभाग - संपूर्ण विभाग

बी विभाग - संपूर्ण विभाग

ई विभाग - संपूर्ण विभाग

एफ दक्षिण विभाग - संपूर्ण विभाग

एफ उत्तर विभाग - संपूर्ण विभाग

पूर्व उपनगरे :    

एल विभाग- कुर्ला पूर्व क्षेत्र

एम पूर्व विभाग - संपूर्ण विभाग

एम पश्चिम विभाग - संपूर्ण विभाग

एन विभाग - विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर

एस विभाग - भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व क्षेत्र

टी विभाग - मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्र

Comments
Add Comment