'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक


मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा, यासाठी " आपली एसटी " या नावाने नवीन ॲप चे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण होत असून भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होईल! तथापि , १२ हजार पेक्षा जास्त बसेसराज्यभरातीललाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले आहे. भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास, प्रवाशांनी त्या जरूर सुचित कराव्यात ,असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. जेणेकरून एक परिपूर्ण ॲप विकसित करण्यास मदत होईल.



आपली एसटी एक मराठमोळे नाव


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी कम्यूटर ॲप नव्या रुपात सादर केलं असून आता या ॲपला ‘आपली एसटी’ (Aapli ST) असे मराठमोळे नाव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. अर्थात, या ॲपमुळे सर्वसामान्य मराठी प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल यावर अधिक भर दिला जाणार आहे.


रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या सहाय्याने विकसित केलेल्या " आपली एसटी "(Aapli ST) पमुळे प्रवासी आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकणार असून प्रवासी माहिती केंद्राद्वारे (‘Passenger Information System’ ) बस कुठून सुटणार (STD) आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA) याची वस्तुस्थिती जन्य (रिअल-टाइम) माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर थांबून वेळ घालवण्याची गरज नाही, तर ते थेट बस उपलब्धतेनुसार थांब्यावर पोहोचू शकतील.


पमध्ये अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा (फीचर्स )उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे, दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे, आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागोवा (लाईव्ह ट्रॅकिंग करणे) घेणे, यांचा समावेश आहे.


याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली असून, एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे.


सध्या या ॲपवर राज्यातील तब्बल १२,००० हून अधिक बसेसचे लाईव्ह डेटा उपलब्ध आहे. भविष्यात सर्व बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत येतील. पुढे प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे ॲपमध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. तसेच लवकरच एसटीचे (MSRTC ) सध्या असलेल्या...तिकिट बुकिंगपमध्येही बसची थेट माहिती (Live Data) समाविष्ट केली जाणार आहे, ज्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल.


एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा असून, आपली एसटी (Aapli ST) ॲप या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.


तसेच महामंडळाने याबाबत प्रवाशांकडून सूचना व अभिप्राय मागवुन , त्यांच्या अपेक्षेनुसार ॲपमध्ये सतत सुधारणा कराव्यात अशी सूचना त्यांनी केली आहे.


सध्या हे ॲप MSRTC commuter app या नावाने प्ले स्टोअर मधून प्रवाशांना डाऊनलोड करून घेता येईल.तथापि, आपली एसटी (Aapli ST) हे नाव लवकरच प्ले स्टोअरमध्ये दिसू लागेल.




Comments
Add Comment

Online Fraud : ॲपच्या नादात फ्लॅट पडला महागात ....

मुंबई : मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण वाढत्या महागाईमुळे

Ek Nath Shinde : कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

पोलीस वसाहत पुनर्विकासासह रखडलेल्या कामांना गती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुर्ला फेस्टिव्हलचे आयोजक आमदार

Maharashtra CM : स्फोटक उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव!

 मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे 'स्फोटके नियम 2008'

Gold Smuggling : मुंबई विमानतळावर डीआरआयची कारवाई, ५ कोटींचे सोने जप्त; ७ अटकेत

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या

मुंबई - गुजरात महामार्गावर वाहतूक कोंडी ; गॅस टँकर उलटला

पालघर : मुंबई-गुजरात महामार्गावरून जात असताना गॅस टँकर उलटला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि गॅस टँकर खोल खड्ड्यात

Eknath Shinde : वरळीतील हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये दुर्दैवी मृत्यू! आयोजक चौकशीच्या फेऱ्यात, एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल कॉन्सर्टदरम्यान २८