ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित आणि कोहलीने आपला शेवटचा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये खेळला होता. त्यानंतर दोघांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व केले. कोहली आणि रोहितने इंग्लंड दौऱ्याच्या आधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. यानंतर शुभमन गिलला कसोटी कर्णधार बनवण्यात आले होते.


रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीयला आधीच निवृत्ती घेतली आहे. दोन्ही खेळाडूंनी २०२४च्या भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशातच हे दोन्ही खेळाडू केवळ वनडे क्रिकेटसाठी उपलब्ध आहेत. आता कोहली आणि रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघात सामील होऊ शकतात.


बीसीसीआय शनिवारी ४ ऑक्टोबरला वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. कोहली आणि रोहितला वनडे संघात सामील करण्याची शक्यता आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यात पहिले तीन वनडे सामने १८ ऑक्टोबरपासून होणार आहेत. यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.



भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक


१९ ऑक्टोबर- पहिली वनडे, पर्थ
२३ ऑक्टोबर - दुसरी वनडे, अॅडलेड
२५ ऑक्टोबर - तिसरी वनडे, सिडनी
२९ ऑक्टोबर - पहिली टी-२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर- दुसरी टी-२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर - तिसरी टी-२०, होबार्ट
६ नोव्हेंबर - चौथी टी-२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर - पाचवी टी-२०, ब्रिस्बेन

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल