आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हे वादळ उत्तर-उत्तर पश्चिम भागाच्या दिशेने वेगाने येत आहे. पुढील २४ ते ४८ तासांत हे वादळ गुजरातच्या सीमेला धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या खाडीमध्ये हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे वादळ गुजरात खाडीच्या दिशेने वेगाने येत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागान दिली.


चक्रीवादळ गुरुवारी रात्री ओडिशा व आंध्र प्रदेशची खाडी पार करेल. ७५ किमी प्रति तास वेगाने हवा वाहत आहे. ३ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ कमकुवत होऊ शकते आणि हवेचा वेग कमी होऊ ५५ किमी प्रति तास इतकी होईल. चक्रीवादळ पुढील पाच दिवस १२ पेक्षा जास्त राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.



ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ, बिहार, पूर्व मध्य प्रदेश व पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळपासून ओडिशामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री चक्रीवादळ ओडिशाची खाडी पार करून आंध्र प्रदेशमधील गोपालपूरमध्ये धडकेल. ओडिशा व आंध्र प्रदेशमधील समुद्रात अथवा किनाऱ्यावर जाणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे