मोठी बातमी: अभिजात मराठी भाषा सन्मान दिवशी जगातील पहिल्यावहिल्या समग्र मराठी ओटीटी अ‍ॅप 'अभिजात मराठी' चे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण

मोहित सोमण:आज अभिजात मराठी भाषा सप्ताहाची सुरूवात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत झाली आहे. यावेळी मराठी भाषेचे ओटीटी अँप 'अभिजात मराठी' चे अनावरण करण्यात आले. यावेळी भाष्य करताना,' सध्याच्या या डिजिटल युगात भाषेचे संवर्धन महत्वाचे आहे. हे संवर्धन करत असताना डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून आपली भाषा जागतिक स्तरावर पोहोचवली पाहिजे ' असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित कार्यक्रमात केले. महाराष्ट्रासह भारतात मराठी भाषेचे वेगळेपण म्हणजे अशी ही एकमेव भाषा जिथे एकाच वर्षी २०० पेक्षा अधिक साहित्य संमेलन होतात जिथे इतर भाषेत २-३ होतात' अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाषेचे महत्व अधोरेखित केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे, विधानपरिषद सदस्य व मुख्य प्रतोद मनिषा कांयदे, मराठी भाषा व महाराष्ट्र सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा,महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदिप दाते, अभिनेता व निर्माते महेश मांजरेकर,मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्ह णाले की, डिजिटल युगात करोडो रुपयांच्या साहित्याची, पुस्तकांची विक्री आजही होते. साहित्यासोबतच आज देशामध्ये वेगवेगळ्या भाषांचे थिएटर होते, त्याच्यामध्ये आता काही प्रमाणात शिथिलता आलेली दिसते. पण मराठी रसिक आणि नाट्यकर्मींनी समृद्ध मराठी रंगभूमी जोपासली असल्याचे त्यांनी सांगितले.


मराठी भाषा कायम अभिजातच राहणार -


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठी भाषेची महती अधोरेखित केली. यावेळी ते म्हणाले,'भाषा ही संस्कृतीला जीवंत ठेवण्याचे माध्यम आहे. देशातील प्रत्येक भाषेने सांस्कृतिक ठेव दिलेली आहे.या सांस्कृ तिक उत्थानात भाषेचे महत्त्व असल्याने स्वभाषा, मातृभाषा आणि इतर भाषांना जीवन ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपली मराठी भाषा ही कालही अभिजात होती, आजही अभिजात आहे, आणि उद्याही अभिजातच राहील' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवें द्र फडणवीस यांनी केले. या अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे हस्ते रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले. याखेरीज मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठीचा सन्मान हा आपल्या सर्वांचा स न्मान आहे. गावातून, घरातून ज्या ओव्या गायल्या, त्या माऊलीचा हा सन्मान आहे. रामप्रहारी येणाऱ्या वासुदेवांचा हा सन्मान आहे. देवळातून गुंजणाऱ्या आरतीचा, भजन-कीर्तनाचा हा सन्मान आहे. संत परंपरेचा, शाहिरांच्या पोवाड्याचा हा सन्मान आहे. संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेपासून तर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनापर्यंत अशा सर्वच विचारवंतांचा हा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.


यावर अधिक भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशातल्या एकूण ग्रंथालयांपैकी २५% टक्के ग्रंथालये महाराष्ट्रामध्ये आहेत. साहित्याची गोडी, विचारांची आवड मराठी माणसाने जोपासून ती पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे. सर्वाधिक वाङ्मय कोश हे मराठी भाषेमध्ये असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर, मराठीमध्ये २०० हून अधिक साहित्य संमेलने प्रतिवर्षी होतात. सर्व प्रकारच्या विचारांना प्रतिपादित करणारी, विविध व्यासपीठे उपलब्ध करून देणारी ए कमेव मराठी भाषा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.


मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र शासन करत राहणार - उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत


'मराठी ही केवळ भाषा नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र शासन करत राहणार,'असे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामं त यांनी केले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी भाषा राजकोष या ऐतिहासिक वारशामुळे केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. तसेच मराठीसोबत प्राकृत भाषेलाही अभिजात दर्जा देऊन महारा ष्ट्राचा सन्मान अधिक वृद्धिंगत झाला असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, जेएनयू (दिल्ली) मध्ये मराठी भाषेचे केंद्र स्थापन करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारलं जाणार आहे. नाशिकजवळील शिरवाडे गाव “पु स्तकाचं गाव” म्हणून विकसित होत आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी महोत्सव ग्रामीण भागात आयोजित केला जाणार आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळ विकत घेऊन तेथे जगातील पहिलं 'वैश्विक मराठी भाषा केंद्र' उभारले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी हेमांगी अंक, नवभारत मासिक विशेषांक, रेडिओवर प्रसारित मुलाखतीवरील ‘मराठीची ये कौतुके’ पुस्तक, संदर्भ ग्रंथालयाची माहिती पुस्तिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अभिजात मराठी या ॲपचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर अ भिजात मराठी दिनानिमित्त भारतीय टपाल विभागामार्फत विशेष टपाल तिकिट आणि आवरणाचे अनावरण करण्यात आले होते.

Comments
Add Comment

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा