IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला



अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करत आहे. भारताच्या भेदक माऱ्यासमोर पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव कोसळला. मोहम्मद सिराजच्या विकेटचा चौकार आणि जसप्रीत बुमराहच्या तीन विकेटच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या डावात अवघ्या १६२ धावांवर रोखले. 


पहिल्या डावात वेस्ट इंडिजची सुरूवात चांगली झाली नाही. १२ धावांवर वेस्ट इंडिजला पहिला झटका बसला. चंद्रपॉल ० धावांवर मोहम्मद सिराजच्या बॉलवर बाद झाला. यानंतर दुसरा सलामी फलंदाज जॉन कॅम्पबेल ८ धावांवर जसप्रीत बुमराहच्या बॉलवर बाद झाला. यानंतर सिराजचा कहर पाहायला मिळाला. त्याने आणखी दोन विकेट मिळवल्या. लंचच्या आधी कुलदीप यादवने वेस्ट इंडिजला पाचवा झटका दिला. शाय होपने आपली विकेट गमावली.



य़ानंतर विंडीजला सातवा झटका सुंदरने दिली. यानंतर बुमराहने विंडीजची ८वी आणि ९वी विकेट घेतली. शेवटची विकेट कुलदीप यादवने घेतली आणि वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी त्यांचे काम केले आता भारताच्या फलंदाजांना अधिकाधिक स्कोर करून विंडीजसमोर मोठे आव्हान करायचे आहे.




भारताचे प्लेईंग ११ - यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल(कर्णधार), ध्रुव जुरेल(विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरहा आणि मोहम्मद सिराज.


वेस्ट इंडिजचे प्लेईंग ११ - तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, एलिक अथानाज, ब्रँडन किंग, शाय होप(विकेटकीपर), रोस्टन चेज(कर्णधार), जस्टिन ग्रीव्स, जोमेल वॉरिकन, खैरी पियरे, जोहान लेन, जेडन सील्स.


Comments
Add Comment

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा