यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर, सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात यूपीएससीअंतर्गत येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आणि इंडियन स्टॅटस्टिक्स सर्व्हिसेसच्या परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. देशात इंडियन इॅकानॉमिक्स सर्व्हिसमध्ये मोहित अग्रवाल नदबईवाला हा पहिला आला आहे. तर ऊर्जा रहेजा दुसऱ्या आणि गौतम मिश्राने तिसऱ्या स्थान पटकावले आहे. दुसरीकडे इंडियन सॅटिस्टीकल सर्व्हिसचे निकाल पाहिले तर कशिस कसाना देशात पहिला आला आहे. त्यानंतर, आकाश शर्मा दुसऱ्या स्थानावर असून शुभेंदू घोष तिसरे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रातील मयुरेश वाघमारे आठव्या स्थानी आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) भारतीय आर्थिक सेवा (आयइएस) / भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. या परीक्षेचा लेखी टप्पा २० जून ते २२ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता, तर मुलाखती सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आल्या होत्या. आयोगाने निकाल जाहीर केल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जातील, अशी माहितीही दिली आहे.

या निकालामध्ये एकूण १२ उमेदवारांचे निकाल तात्पुरते ठेवण्यात आले आहेत. आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या उमेदवारांचे निकाल तात्पुरते ठेवण्यात आले आहेत, त्यांच्याकडून आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे तपासली जाऊन त्यांच्या 'तात्पुरत्या' स्थितीबद्दल स्पष्टता मिळेपर्यंत, आयोगाकडून त्यांना नोकरीची ऑफर दिली जाणार नाही. सर्व पात्र उमेदवारांनी पुढील प्रक्रिया आणि सूचनांसाठी आयोगाच्या वेबसाइटला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिष्ठित इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत सोलापूरचे मयुरेश भारत वाघमारे यांनी आठवा क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, एकूण १२ जागांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी झालेले मयुरेश वाघमारे हे एकमेव उमेदवार आहेत. यूपीएससीकडून जून २०२५ मध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील तब्बल ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

मयुरेश वाघमारे हे सध्या अलिबाग येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले भारत वाघमारे यांचे चिरंजीव आहेत. तसेच, त्यांचे आजोबा अंगद वाघमारे हे देखील उपजिल्हाधिकारी होते. प्रशासकीय सेवेतील ही उज्ज्वल कौटुंबिक परंपरा मयुरेश यांनी एक पाऊल पुढे नेत आयएएस श्रेणीतील या परीक्षेत यश मिळवले. या नेत्रदीपक यशानंतर मयुरेश वाघमारे यांची निवड केंद्रीय वित्त मंत्रालयात किंवा रिझर्व्ह बँकेत उच्च पदावर होण्याची शक्यता आहे. मयुरेश वाघमारे यांनी आपले प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे पूर्ण केले. तर, बारावीचे शिक्षण संगमेश्वर कॉलेजमध्ये झाले. त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण इंग्लंड येथून ॲग्रीकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनॉमिक्स या विषयात घेतले.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या