VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या नुकत्याच झालेल्या राजकीय रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेची तीव्रता खूप मोठी असून, या चेंगराचेंगरीत ४० निष्पाप लोकांचा हकनाक मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असल्याने विजय थलापती आणि त्याच्या पक्षाचे व्यवस्थापन सध्या टीकेचे लक्ष्य ठरले आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आणि कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातील सुनावणी मद्रास हायकोर्टाने सध्या पुढे ढकलली आहे. या दुर्घटनेमुळे विजय थलापतीच्या राजकीय कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तसेच राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या आवश्यकतेवर या घटनेने पुन्हा एकदा बोट ठेवले आहे.



टीव्हीके जिल्हा सचिवांना अटक; विजय थलापती वादात


अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम (TVK) पक्षाचा नेता विजय थलापती (Vijay Thalapathy) याच्या राजकीय रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. करूर येथे झालेल्या या भीषण दुर्घटनेत ४१ जणांचा हकनाक मृत्यू झाला होता, तर अनेक नागरिक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी टीव्हीके पक्षाच्या जिल्हा सचिवांना अटक केली आहे. या प्रकरणात पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या या रॅलीत चेंगराचेंगरी झाली, तेव्हा विजय थलापती यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विजय आपल्या सभेसाठी जाणूनबुजून उशिरा आले असल्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन बिघडले आणि ही दुर्घटना घडली, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, टीव्हीके पक्षाला कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम किंवा रॅली आयोजित करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी एक याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयाने ती सुनावणी सध्या रद्द केली आहे. या प्रकरणामुळे विजय थलापती आणि त्यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली.

दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात

Para-athlete...लग्नातील किरकोळ वादातून हरियाणातील पॅरा-अ‍ॅथलिटची निर्घृण हत्या

हरियाणा : रोहतक येथे एका राष्ट्रीय स्तरावरील पॅरा-अ‍ॅथलिटवर झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात