कुट्टू एनर्जी बार्स

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे


उपवासात किंवा हलक्या-फुलक्या स्नॅक्ससाठी झटपट, पौष्टिक आणि एनर्जीने भरलेला पर्याय आपण नेहमीच शोधत असतो. पारंपरिक पद्धतीने बनणाऱ्या फराळाच्या पदार्थांना थोडासा हटके टच देत, कुट्टूच्या पिठापासून तयार केलेले कुट्टू एनर्जी बार्स ही एक भन्नाट डिश कशी बनवायची हे आज आपण जाणून घेणारआहोत. कुट्टू हा प्रथिनांचा, फायबरचा आणि खनिजांचा उत्तम स्त्रोत असल्यामुळे शरीराला आवश्यक ताकद मिळते, तसेच पोटभरीचे आहे.


खजूर, सुका मेवा, मध/ गुळ नैसर्गिक गोडसर घटकांनी एकत्रित केलेले हे बार्स चवीलाही मस्त आणि आरोग्यदायी आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हे एनर्जी बार्स उपवासापुरतेच नाही, तर प्रवासात, ऑफिसमधील स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्येही एक परफेक्ट हेल्दी ट्रीट ठरू शकते.



साहित्य :


कुट्टू पीठ – १ कप
शेंगदाणे भाजलेले व सोललेले – अर्धा कप
खजूर (बी काढून) – ८ ते १०
सुकामेवा (बदाम, काजू, अक्रोड) –अर्धा कप (कापून)
गूळ (किंवा मध) – अर्धा कप
तूप – २ टेबलस्पून
वेलदोडा पूड – अर्धा टीस्पून
ड्राय नारळ किस – २ टेबलस्पून
कृती : कढईत तूप गरम करून त्यात कुट्टू पीठ मंद आचेवर छान भाजून घ्या (छान खमंग सुगंध येईपर्यंत).
गूळ थोड्याशा पाण्यात/किंवा थोड्या तुपात वितळवून पाक बनवा (एकतारी).
खजूर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
मोठ्या वाडग्यात भाजलेलं कुट्टू पीठ, खजूर, शेंगदाणे, सुकामेवा, वेलदोडा पूड, नारळ किस एकत्र करून त्यावर गुळाचा पाक ओता.
लगेच सगळं नीट मिसळून तूप लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये पसरवा.
हाताला थोडं तूप लावून दाबून गुळगुळीत करा आणि चौकोनी/आवडीनुसार बार्स कापा.
थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.



खास टिप्स


जर तुम्हाला च्युयी बार्स हवेत तर गूळ थोडा जास्त वापरा.
क्रंची टेक्स्चरसाठी भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल बी, भाजलेले जवस (फ्लॅक्ससीड्स) घालू शकता.
हे बार्स फ्रीजमध्ये ८-१० दिवस टिकतात.


Comments
Add Comment

पनीर पकोडा पराठा!

मुलांना रोजच्या पराठ्यात नवा बदल हवा असतो आणि पनीरसारखी हेल्दी गोष्ट दिली, तर त्यांच्या वाढीला सर्वात चांगला

सुंदर मी होणार - भाग १

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके सख्यांनो, हे शीर्षकच किती आकर्षक आहे नाही ? सुंदर कोणाला व्हावंसं वाटत नाही ? चार

समाजदायित्वाची तेजस्विनी वाटचाल

कर्तृत्ववान ती राज्ञी : डॉ. जयश्री कुलकर्णी वैशाली गायकवाड नमस्कार मैत्रिणींनो ! २०२५ या वर्षात सुरू झालेल्या या

प्लेसेंटा प्रिव्हिया

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणेदरम्यान बाळाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी प्लेसेंटा (अपरा) हा अत्यंत

लगीनसराईत नववधूच्या सौंदर्याची चमक!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर आली लगीनसराई...लग्नसमारंभ म्हणजे केवळ एक विधी नव्हे, तर तो आनंदाचा, उत्साहाचा आणि

नाचणीचे बिस्कीट

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे दिवाळीचा फराळ म्हटलं की गोड, तूप, साखर आणि सुगंध यांचा संगम आठवतो. पण आजच्या