कोलंबो: क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि रोमांचक बातमी आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. ही बहुप्रतिक्षित लढत येत्या रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
थरार पुन्हा एकदा
महिला विश्वचषक स्पर्धेला आजपासून (३० सप्टेंबर २०२५) सुरुवात होत आहे. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना यजमान श्रीलंकेविरुद्ध बंगळूरु येथे होणार आहे. यानंतर चाहत्यांचे डोळे लागले आहेत ते ५ ऑक्टोबरच्या सामन्याकडे.
भारत-पाकिस्तान लढतीचा इतिहास
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. भारत आणि पाकिस्तान महिला संघात आतापर्यंत ११ एकदिवसीय सामने झाले आहेत आणि या सर्व सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारताविरुद्ध विश्वचषकात पहिला विजय मिळवण्याची संधी असेल.
दुपारी ३ वाजता होणार सुरुवात
कोलंबो येथे होणारा हा हाय-व्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.०० वाजता सुरू होईल.