'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट केल्याने एका आईने आपल्या दोन मुलांना काठीने मारहाण केली. या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पालघरच्या काशीपाडा परिसरात घडली आहे. मृत सात वर्षांच्या मुलाचे नाव चिन्मय धुमडे होते. सध्या पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


पालघरच्या जुना सातपाटी रोडवरील काशीपाडा येथील घोडेला कॉम्प्लेक्समधील शाम रिजन्सी नावाच्या इमारतीत पल्लवी धुमडे (वय ४०) नावाची महिला तिचा मुलगा चिन्मय (वय ७) आणि मुलगी लव्या (वय १०) यांच्यासह तिच्या बहिणीच्या घरी राहत होती. ती काही महिन्यांपूर्वी आपल्या पतीशी झालेल्या वादामुळे भाईंदरहून पालघर शहराजवळच्या काशीपाडा येथे राहण्यासाठी आली होती. दोन्ही मुले चिन्मय आणि लव्या त्यांची आई पल्लवी यांच्याकडे चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट करत होते. आईने दोन्ही मुलांना सांगितले की नवरात्री सुरू असल्यामुळे त्यांनी उपवास केला आहे आणि त्यांना चिकन लॉलीपॉप मिळणार नाही.


तरीही मुले चिकन लॉलीपॉप खाण्याच्या हट्टावर ठाम राहिली. याच वेळी आई पल्लवीला राग अनावर झाला आणि तिने दोन्ही मुलांना काठीने मारहाण केली. या मारहाणी दरम्यान काठी चिन्मयच्या डोक्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान सात वर्षांच्या चिन्मयचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२६ सप्टेंबर) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ आणि गोंधळ उडाला आहे.


मुलाच्या मारहाणीतून मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपी आई पल्लवी धुम्डे हिच्यावर पालघर पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आईला पोलिसांनी अटक केली आहे आणि पालघर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. तथापि, या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

महापालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या

अखेर अनमोल बिश्नोईच्या अमेरिकेत आवळल्या मुसक्या, भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग!

नवी दिल्ली : गँगस्टर अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे अशी

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

एनडीए बिहारमध्ये पास, दिल्ली आणि महाराष्ट्रात 'स्थानिक'च्या परीक्षेसाठी सज्ज

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. एनडीए बिहार