मुंबई : दसऱ्याच्या दिवशी मुंबईत शिवसेनेचा मेळावा असतो. यंदा परंपरेनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या सभा दसऱ्याच्या निमित्ताने मुंबईत होणार आहेत. यामुळे मुंबईत दसऱ्याच्या दिवशी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते
१. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते एस बँक सिग्नल)
२. केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), दादर.
३. एम. बी. राऊत मार्ग, (एस. व्ही. एस. रोड) दादर.
४. पांडुरंग नाईक मार्ग, (एम. बी. राऊत रोड) दादर
५. दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर
६. दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ५ ते शितलादेवी रोड) दादर.
७. एन. सी. केळकरमार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक), दादर
८. एल.जे. रोड, राजा बडे जंक्शन ते गडकरी
वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग
१. स्वातंत्र वीर सावरकर मार्ग (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन)
पर्यायी मार्ग :- सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.
२. राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत.
पर्यायी मार्ग :- एल. जे. रोड, गोखले रोड-स्टिलमॅन जंक्शन वरून पढे गोखले रोडचा वापर करतील.
३. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी.
पर्यायी मार्ग :- राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.
४. गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर.
पर्यायी मार्ग :- एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा.