कोस्टल रोडवर ANPR कॅमे-याची कमाल; १३२ किमी वेगाचा विक्रम, रोज ४६५ नियमभंग! जाणून घ्या पूर्ण बातमी

मुंबई : मुंबईच्या ‘हाय-स्पीड’ कोस्टल रोडवर सुरूवातीपासूनच वाहनचालकांचा वेगावर ताबा सुटल्याचं चित्र समोर आलं आहे. फक्त २४ दिवसांत तब्बल १६ हजार ई-चलनांची नोंद झाली असून, रोज सरासरी ४६५ उल्लंघनं होत असल्याचे वाहतूक विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.


४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत नोंद झालेल्या प्रकरणांत ११,१७३ वाहनचालकांवर वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल कारवाई करण्यात आली. हे सर्व चलनांपैकी तब्बल ७२ टक्के आहे. याशिवाय ४,४२३ वाहनचालकांवर बस लेनचा वापर केल्याबद्दल दंड आकारण्यात आला. एका वाहनाचा कमाल वेग १३२ किमी प्रतितास इतका नोंदवण्यात आला, जो प्रवाशांच्या जीवितासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो.


कोस्टल रोडवरील वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणाली (ANPR) कॅमेरे बसवण्यात आले असून, या कॅमेऱ्यांतूनच हे सर्व उल्लंघन पकडले गेले. वाहतूक विभागाने वेगमर्यादा मोडल्यास २,००० रुपये दंड, तर बस लेनमध्ये घुसखोरी केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी ५०० रुपये आणि वारंवार उल्लंघन झाल्यास १,५०० रुपयांचा दंड निश्चित केला आहे. मुख्य रस्त्यावर वेगमर्यादा ८० किमी, बोगद्यांत ६० किमी आणि इंटरचेंजवर ४० किमी प्रतितास अशी मर्यादा घालण्यात आली आहे.


संयुक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी स्पष्ट केले की, “हा रस्ता हाय-स्पीड कॉरिडॉर असला तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचं काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. वारंवार नियम मोडणाऱ्यांवर एफआयआर दाखल होऊ शकतो तसेच त्यांची वाहने देखिल जप्त केली जाऊ शकतात.”


या मार्गावरील सात ANPR कॅमेरे वाहनांवर लक्ष ठेवत आहेत. चार कॅमेरे वरळीतील बडोदा पॅलेसजवळ तर तीन कॅमेरे दुहेरी बोगद्यांत बसवण्यात आले आहेत. रात्री उशिरा आणि पहाटे, जेव्हा रस्त्यावर कमी वाहतूक असते, तेव्हा वेगमर्यादा मोडण्याचे प्रकार सर्वाधिक दिसून येतात.


दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी लॅम्बोर्गिनी, फेरारीसारख्या सुपरकार्सने या रस्त्यावर शर्यत लावल्याच्या आणि प्रचंड आवाज निर्माण केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ब्रीच कँडी रहिवासी मंचाच्या नंदिनी छाबरिया यांनी सांगितले की, “आमच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी गस्त वाढवली असून, मागील दोन आठवड्यांत ही समस्या बरीच आटोक्यात आली आहे.”


मुंबईकरांना दिलासा देणारी ही बाब असली तरी कोस्टल रोडवरचा वेगाचा वेडेपणा अजूनही गंभीर आव्हान म्हणून उभे आहे. अपघातांना आमंत्रण देणाऱ्या या बेफाम धावपट्टीवर शिस्त प्रस्थापित करणं हेच पोलिसांसमोरचं खरं आव्हान ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंब्रा,कुर्ल्यात ATS छापे; 'अल्-कायदा' लिंकचा संशय!

मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संशयित मूलतत्त्ववादी गतिविधींच्या चौकशीचा भाग म्हणून बुधवारी मुंब्रा

गोविंदाला 'चक्कर'! व्यायामामुळे थकवा, रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलेल्या मुंबईतील क्रिटीकेअर

कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग

मुंबई : कुर्ला (पश्चिम) परिसरातील एल.बी.एस रोड वरील शीतल टॉकीज जवळच्या हॉटेल सन लाईटमधील तळमजल्यावर भीषण आग लागली.

लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार - मंत्री आशिष शेलार

मुंबई : लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या "इंडिया हाऊस"ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास

Central Railway : लोकलची 'लेटलतिफी' आता बंद! मध्य रेल्वेवर लवकरच लोकल 'सुसाट' धावणार, जबरदस्त प्लॅन नेमका काय?

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून (Central Railway Line) प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची

मुंबईतील नऊ विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला राज!

पुरुषांना प्रभाग शोधण्याची आली वेळ मुंबई (सचिन धानजी)  मुंबईतील २२७ प्रभागांकरता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर