'राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे का हे तपासणार'


यवतमाळ : लोकसभा निवडणुकीआधी राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका होण्याआधीच राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का हे तपासणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला येथे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक झाली. रास्ता रोको करुन दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.


https://www.youtube.com/live/iK-_GeR91W4

राज्यात वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी जातीवरुन किंवा धर्मावरुन तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ताजी अहिल्यानगरमधील घटना ही अशाच स्वरुपाची असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पोलीस तपास करू आणि नंतर योग्य ती कारवाई करू असे स्पष्ट संकेत दिले आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना पत्रकारांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील घटनेबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना प्रवासात होतो त्यामुळे सविस्तर माहिती नाही. मी माहिती घेऊन नंतर बोलेन, पण आतापर्यंत जे कळले आहे त्यानंतर तपास सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातले वातावरण हेतूपुरस्सर बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का ? याचाही तपास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.


याआधी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला येथे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक झाली. रास्ता रोको करुन दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलीस कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.


Comments
Add Comment

पावसाचे कारण सांगून गैरहजर रहाणा-या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये

ट्रेनची टक्कर थांबवणार! 'कवच' प्रणालीमुळे आता अपघात टळणार का? मध्य रेल्वेने केला मोठा दावा

मध्य रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा: मुंबई विभागात 'कवच' प्रणालीची यशस्वी चाचणी! सर्व ५ विभागांमध्ये 'कवच' लोको चाचण्या

आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला BCCI कडून मिळणार मोठं बक्षीस

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषक २०२५ ही टी २० क्रिकेट स्पर्धा जिंकली. भारताने सलग

अहिल्यानगर : कोटलामध्ये दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील कोटला गावातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तणाव वाढला. दुर्गा मातेची मिरवणूक

PoK : ३००० पाकिस्तानी सैनिक तैनात, इंटरनेट आणि फोन सेवा बंद; PoK मध्ये नेमकं काय शिजतंय?

मुजफ्फराबाद : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सध्या मोठी राजकीय आणि सामाजिक उलथापालथ होत आहे. स्थानिक नागरिक आणि

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन