दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास, ओटीटीवर स्त्रीशक्तीचा उत्सव

दुर्गा ऑफ अल्ट्रा झकास – नवरात्रीत मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीशक्तीच्या नऊ रूपांचा अल्ट्रा झकास ओटीटीवर होणार अनोखा उत्सव!


मुंबई : नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ रंग आणि नऊ रूपं – या अनोख्या संकल्पनेला आकार देत अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे ‘अल्ट्रा झकासची दुर्गा’ हा खास संग्रह. या विशेष निवडीतून नऊ वेगवेगळ्या मराठी चित्रपटांद्वारे नऊ ‘अद्वितीय स्त्री’ पात्रं पडद्यावर जागृत होत आहेत.


या सर्व चित्रपटांमध्ये स्त्रियांची संघर्षमय, भावनिक आणि प्रेरणादायी वाटचाल दिसते. कुणी आत्मशोधाच्या प्रवासाला निघते, कुणी समाजातील अन्यायाला आव्हान देते, कुणी नात्यांतील गुंतागुंत आणि जबाबदाऱ्यांशी झुंजते, तर कुणी प्रेम, संवेदनशीलता आणि त्यागाचं सामर्थ्य दाखवते. या कथा स्त्रीशक्तीची विविध रूपं उलगडत, प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडतात.


१. काळूबाई पावली नवसला -अलका कुबल
श्यामराव आणि राधिकाला कामिनी मुलगी होते. एका वादातून राधिकेचा मृत्यू होतो. कामिनीला काकू छळते, पण आई काळूबाई नेहमीच तिच्या सोबत असतात. वर्षांनंतर कामिनी मोठी झाल्यावरही आई काळूबाई तिचं रक्षण करतात.


२. पैंजण – वर्षा उसगावकर
स्टार कलाकार पिलाजीराव बेपत्ता होतो. इन्स्पेक्टर अजय देशमुख चौकशी करतात आणि तमाशा पथकाच्या गुपितांतून गूढ रहस्य उलगडू लागतं.


३. हंपी – सोनाली कुलकर्णी
ईशा स्वतःला शोधायला हंपीला जाते. तिथे तिला कबीर भेटतो जो तिला छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकवतो. त्यांच्या मैत्रीतून जीवनात नवा रंग भरतो.


४. सावर रे – मुक्ता बर्वे
मुक्ता एका अपघातात अपंग होते. तिची बहीण इंदू स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून बहिणीची सेवा करते आणि अपघात करणाऱ्या ड्रायव्हरला शोधण्याच्या निर्धाराने पुढे जाते.


५. RESPECT – प्राजक्ता माळी
सात महिलांच्या वेगवेगळ्या कथा, ज्या एकमेकांना कधी भेटल्या नाहीत, पण त्यांचा संघर्ष त्यांना एकमेकांशी जोडतो.


६. फटाकडी – सुषमा शिरोमणी
वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी फटकडी खुनीच्या मुलाला सत्य दाखवण्याचा प्रयत्न करते. या प्रवासात तिला बावल्या नावाच्या पोलिसाची साथ मिळते.


७. संहिता – देविका दफ्तरदार
एका निर्मात्याची पत्नी तिच्या आजारी पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माहितीपट निर्मात्याला कामावर घेते. त्यातून राजघराण्याची कथा – राजा, राणी आणि दरबारी गायक यांच्यातील प्रेम-कर्तव्य-विश्वासघाताची कहाणी उलगडते.


८. गौरीच्या लग्नाला यायचं हं – स्मिता तांबे
गौरीच्या काळ्या रंगामुळे तिला नवरा मिळत नाही आणि ती नैराश्यात जाते. पण एक शाळामास्तर तिचा आत्मविश्वास वाढवतो. मैत्री हळूहळू प्रेमात बदलते आणि गौरी अखेर लग्नाच्या मंडपात पोहोचते.


९. लोकशाही – तेजश्री प्रधान
एका मुलीला वडिलांचा राजकीय वारसा मिळतो. पण त्या वारशामागचं सत्य उलगडताना तिला कटकारस्थानं, कौटुंबिक संघर्ष आणि न्यायासाठीची लढाई यांचा सामना करावा लागतो.


या नऊ चित्रपटांतून नवरात्रीचे नऊ रंग आणि स्त्रीत्वाच्या नऊ शक्तिरूपांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. अल्ट्रा झकास ओटीटीचा हा उपक्रम स्त्रीशक्तीचा सन्मान करताना प्रेक्षकांना नव्या प्रेरणाही देतो. ‘अल्ट्रा झकासची दुर्गा’ हा संग्रह फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो स्त्रीशक्तीचा गौरव करणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा आहे. नवरात्रीच्या निमित्ताने इंस्टाग्राम वर “नवरात्री ९ दिवस – ९ रंग” ही विशेष मोहीमही राबवली जात आहे. या मोहिमेतून दररोज त्या दिवसाचा रंग, त्याचा अर्थ आणि संबंधित देवीचं प्रतीकात्मक दर्शन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचा हा उपक्रम स्त्रीत्वाच्या विविध छटा साजऱ्या करताना नवरात्रीच्या उत्सवाला एक नवा सांस्कृतिक आयाम प्रदान करतो. शिवाय अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांना याचा आनंद कधीही, कुठेही घेता येईल.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

नव्या आकर्षक पोस्टरसह ‘द पॅराडाईज’ची घोषणा

मुंबई : २०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून द पॅराडाईजची ओळख निर्माण झाली आहे. चित्रपटाची

शुभारंभ शुभदिनी, नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

मुंबई : सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते… आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतोय!

दीपिकाच्या पोस्टवरील रणवीर सिंगची कमेंट जिंकतेय चाहत्यांची मने

मुंबई : रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तो ‘परफेक्ट हसबंड गोल्स’ का आहे. पत्नी दीपिका पादुकोणच्या

कलेक्टिव स्टुडिओजच्या रॅटपॅक स्टोरीज आणि मधु मंटेनांच्या मॅड मॅन फिल्म्स यांचे दोन चित्रपटांसाठी सहकार्य

मुंबई : कलेक्टिव स्टुडिओज आणि मॅड मॅन फिल्म्सचा भाग असलेली रॅटपॅक स्टोरीज आता एका नव्या प्रोडक्शन भागीदारीत

‘लाहोर १९४७’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : आमिर खान प्रॉडक्शन्सने त्यांच्या आगामी कालखंडावर आधारित भव्य चित्रपट ‘लाहोर १९४७’ च्या थिएटरमधील