नवी मुंबईसह सर्व महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार

नवी मुंबई : नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घरे आपण नियमित करण्याचा निर्णय घेतला. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत आणि तो निर्णय लवकरच होईल. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समिती गठित केली असून, त्यानुसार बदल केले जातील. अटल सेतूमुळे नवी मुंबईमध्ये जलदगतीने पोहोचणे शक्य होत आहे. मेट्रोचे जाळे, नवीन रस्ते अशी सगळी कामे आपण करत आहोत. या सर्वांच्या बळावर नवी मुंबई मनपा सहित सर्व मनपांवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.


लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून नेत्यांनी आता कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ते नवी मुंबईत बोलत होते.


अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले असून, काही भागातील पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अशा अवघड परिस्थितीत मी स्वतः अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन आलो. त्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, तर त्यांना नक्की मदत करणार. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आजही इथे वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक आपत्तीमध्ये धावून जाण्याचे काम शिवसैनिक करत असतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव!

केंद्राला प्रस्ताव पाठविल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Central Railway : मध्य रेल्वेचा 'मास्टरप्लॅन'! सीवूड्स-उरण मार्गावर २० नव्या लोकल धावणार, ऑक्टोबरपासून प्रवास होणार सुपरफास्ट

नवी मुंबई : सिवूड्स दारावे-बेलापूर-उरण या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक अत्यंत

विविध समाजात भांडणे लावण्याचे ‘उद्योग’ हाणून पाडू!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाम प्रतिपादन नवी मुंबई : ''राज्यात मराठा समाजाचा विचार करत असताना समाजातले जे

ठाणे ते नवी मुंबई विमानतळाचे अंतर काही मिनिटांचे

ठाणे ते नवी मुंबई विमानतळाचे अंतर काही मिनिटांचे मुंबई:नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन येत्या ३० सप्टेंबरला

अझरबैजान देशाला भारताचे व्यापारी महत्त्व समजले

भागिदारी वाढवली, तेल निर्यात सुरू नवी मुंबई : पाकिस्तानचा खास मित्र अझरबैजान देशाने भारतासोबत मैत्री अधिक केली

Dilip Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात पोलिसांची मोठी चाल, दिलीप खेडकरचा ड्रायव्हर अखेर पोलिसांच्या तावडीत

नवी मुंबई : बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात दाखल झालेल्या अपहरण प्रकरणात नवी