सैफ अली खानचा धक्कादायक खुलासा: 'पैसे घेण्यासाठी एका महिला निर्मातीची अश्लील मागणी पूर्ण करावी लागायची!'

बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात मिळाला विचित्र अनुभव; आठवड्याला १ हजार रुपयांसाठी करावे लागायचे १० वेळा किस


मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याच्या अभिनयाच्या सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत धक्कादायक अनुभव नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे. सैफने खुलासा केला की, त्याला जेव्हाही पैसे मिळायचे, तेव्हा एका महिला निर्मातीची विचित्र आणि अश्लील मागणी त्याला पूर्ण करावी लागत असे.

आजच्या घडीला सैफ अली खान बॉलिवूडमधील एक स्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात आणि समीक्षकही त्याचे कौतुक करतात. ३० वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत, पण त्याचा सुरुवातीचा प्रवास इतका सोपा नव्हता.

सैफ अली खान हा पतौडी घराण्यातील आहे. त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे माजी भारतीय क्रिकेटपटू होते, तर आई शर्मिला टागोर त्यांच्या काळातील टॉप अभिनेत्री होत्या. यामुळे इंडस्ट्रीतील त्याचा प्रवास सोपा वाटत असला तरी, त्याने करिअरमध्ये खूप मेहनत घेतली. अलीकडेच एका मुलाखतीत त्याने सुरुवातीचे दिवस आठवले, जेव्हा त्याला मुख्य भूमिका असलेले चित्रपट मिळत नव्हते.

सैफने सांगितले, "मी माझ्या करिअरमध्ये सेकंड लीड किंवा थर्ड लीड अशा भूमिका केल्या. काही चित्रपट चांगले होते, ज्यामुळे माझा गाडा चालत राहिला. पण एक वेळ अशी आली की, एकामागून एक चित्रपट खूप वाईट फ्लॉप झाले." याच दरम्यान, एका महिला निर्मातीने त्याला आठवड्याला १,००० रुपये देण्याची ऑफर दिली होती. पण त्या बदल्यात ती निर्माती सैफच्या गालावर दहा वेळा पप्पी (किस) करण्याची मागणी करायची, असा धक्कादायक खुलासा सैफने केला.

सैफ पुढे म्हणाला की, ९० चा दशक त्याच्यासाठी एका प्रॅक्टिस सेशनसारखा होता, जिथे तो खूप काही शिकत होता. "लोक म्हणायचे की, तुला खूप संधी मिळाल्या, तू नशीबवान आहेस. पण खरं सांगायचं तर मला इंडस्ट्रीतील सर्वात चांगले चित्रपट मिळत नव्हते किंवा मी मुख्य भूमिकेत नव्हतो," असेही सैफने स्पष्ट केले.

सैफच्या करिअरला २००१ साली आलेल्या 'दिल चाहता है' या चित्रपटाने कलाटणी मिळाली. या चित्रपटानंतर त्याचा प्रवास वेगाने पुढे सरकला. त्याला त्याच्या कारकिर्दीतील पहिले आणि एकमेव अभिनय श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार २००४ साली 'हम तुम' चित्रपटासाठी मिळाला. यानंतर २००६ मध्ये त्याने 'ओमकारा' चित्रपटातून समीक्षकांमध्येही आपले स्थान पक्के केले.

सैफ अली खानच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच अक्षय कुमारसोबत प्रियदर्शन दिग्दर्शित 'हैवान' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, तो 'रेस' फ्रँचायझीच्या चौथ्या भागातही दिसणार आहे.

दरम्यान, सैफच्या या खुलाशामुळे चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या काळात बाहेरील कलाकारांना कोणत्या प्रकारच्या विचित्र मागण्यांना तोंड द्यावे लागते, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना

आजीच्या साडीतून बनवलेला कॉश्च्यूम घालून रोहित राऊतने गायले 'रोअर ऑफ सह्याद्री'

मुंबई : सध्या सोशल मीडियावर i-popstar या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम होणारा हा शो १८

TMKOC फेम भव्य गांधीने बबितासोबतच्या साखरपुड्याच्या अफवेवर सोडलं मौन

मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता भव्य गांधी, म्हणजेच सगळ्यांचा

नेटकरी मलायकावर भडकले! आधीच झाली ट्रोल, त्यात प्रतिक्रिया पण 'बोल्ड'; बघा Video

मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका

जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- 'ताठ कणा'

मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील