दुबई: आशिया कपच्या फायनलमध्ये आज भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ समोरासमोर आहेत. ४१ वर्षांच्या इतिहासात हे दोन्ही संघ पहिल्यांदा फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. या सामन्यात भारताने टॉस जिंकला आहे. भारताने पाकिस्तानला फलंदाजीसाठी निमंत्रित केले असून ते गोलंदाजी करणार आहेत.
हार्दिक पांड्या या सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या जागी रिंकु सिंहला संधी मिळाली आहे. गेल्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. एका षटकाच्या गोलंदाजीनंतर तो मैदानाबाहेर गेला होता. तेव्हापासून तो फायनल खेळेल की याबाबत साशंकता होती.
आशिया कपमध्ये आतापर्यंत भारताचे अभियान विजयी राहिले आहे. त्यांनी सलग ६ सामने जिंकत फायनल गाठली आहे. तर पाकिस्तानला दोन सामन्यांत पराभव मिळाला आहे. दोन्ही वेळेला भारतानेच पाकिस्तानला धूळ चारली आहे.
भारताचे संभाव्य प्लेईंग ११: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार) तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
पाकिस्तानचे संभाव्य प्लेईंग ११ : साहिबजादा फरहान, फखर जमां, सैम अयूब, सलमान अली आगा, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), हुसैन तलत, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन शाह आफरीदी, अबरार अहमद आणि हारिस रऊफ.