IND vs PAK Final: फायनलच्या आधी टीम इंडियाला मोठा झटका


दुबई: आशिया कपचा फायनल सामना आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाईल. या स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडतेय जेव्हा फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने आहेत. मात्र या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.


हार्दिक पांड्या या सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या जागी रिंकु सिंहला संधी मिळाली आहे. गेल्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. एका षटकाच्या गोलंदाजीनंतर तो मैदानाबाहेर गेला होता. तेव्हापासून तो फायनल खेळेल की याबाबत साशंकता होती.


आशिया कपमध्ये आतापर्यंत भारताचे अभियान विजयी राहिले आहे. त्यांनी सलग ६ सामने जिंकत फायनल गाठली आहे. तर पाकिस्तानला दोन सामन्यांत पराभव मिळाला आहे. दोन्ही वेळेला भारतानेच पाकिस्तानला धूळ चारली आहे.



भारताचे संभाव्य प्लेईंग ११: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार) तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.


पाकिस्तानचे संभाव्य प्लेईंग ११ : साहिबजादा फरहान, फखर जमां, सैम अयूब, सलमान अली आगा, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), हुसैन तलत, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन शाह आफरीदी, अबरार अहमद आणि हारिस रऊफ.




Comments
Add Comment

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक

भारतीय संघ कसोटीत अपयशी; टी - २० त ‘ब्लॉकबस्टर’!

मुंबई  : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२५ हे वर्ष संमिश्र यश देणारे ठरले. या वर्षात भारताने १० कसोटी, १४ वनडे आणि २२

पाकिस्तानच्या नक्वीचा भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंनी केला अपमान

मुंबई  : जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर ३४७

भारत दौऱ्यातून मेस्सीला ८९ कोटींची कमाई, भारताला कररूपाने ११ कोटींचे उत्पन्न

मुंबई  : लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकताच भारताचा दौरा केला होता. कोलकाता येथे झालेल्या १३ डिसेंबर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाची सहाव्या स्थानावर घसरण

नवी दिल्ली  : माऊंट मांघनाई इथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा ३२३ धावांनी धुव्वा उडवत न्यूझीलंडने

युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या