कोरोनाचा ‘एक्सएफजी’ नवा व्हेरिएंट; सतर्क राहण्याची गरज

‘एक्सएफजी’ व्हेरिएंटमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ


नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत कोरोना व्हायरसचा संपूर्ण जगाला फटका बसला होता. कोरोना व्हायरसमुळे अनेक कुटुंबांना आपल्या सदस्यांना गमवावे लागले. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार करोनाचा ‘एक्सएफजी’ व्हेरिएंट समोर आला आहे. त्याला स्ट्रेटस असे म्हटले जाते. जानेवारीमध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदा आढळला आणि आता तो अनेक देशांमध्ये पसरला आहे. तज्ज्ञांच्या मते, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे आणि भारतासह संपूर्ण जगाने सतर्क राहण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये स्ट्रेटस पहिल्यांदा आढळून आला. जूनपर्यंत तो ३८ देशांमध्ये पसरला होता. अमेरिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, अमेरिकेच्या नऊ राज्यांमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामध्ये न्यू यॉर्क, न्यू जर्सी, डेलावेअर, वर्मोंट, मिशिगन, विस्कॉन्सिन, मिनेसोटा, नॉर्थ डकोटा आणि साउथ डकोटा यांचा समावेश आहे.



स्ट्रेटसची ‘ही’ लक्षणे आहेत



  • श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत जडपणा जाणवणे

  • घसा खवखवणे

  • डोकेदुखी आणि अंगदुखी

  • पोट खराब होणे किंवा भूक न लागणे

  • मळमळ आणि उलट्या

  • मानसिक थकवा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण

  • चव आणि वासाची जाणीव कमी होणे


अशी घ्या आरोग्याची काळजी



  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीव्हायरल औषधे घ्या.

  • घरगुती उपचाराने आराम मिळू शकतो.

  • नीट विश्रांती घ्या, खूप दगदग किंवा जास्त काम करू नका.

  • संतुलित आहार घेऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

Comments
Add Comment

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत