क्रिकेटप्रेमींसाठी मोठा दिवस !आज भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया कपचा फायनल सामना

दुबई: क्रिकेटप्रेमींसाठी आज मोठा दिवस आहे. आशिया कप २०२५ चा अंतिम सामना पारंपरिक प्रतिस्पर्धक भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल. अंतिम विजेतेपदासाठी त्यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.आशिया चषकातील १७ हंगाम आणि ४१ वर्षांनंतर हा योगायोग जुळून आला आहे


 भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघ आशिया कपमध्ये आतापर्यंत एकही सामना हरला नाही. सुपर-४ मध्ये सुद्धा भारतीय संघाने विजयाचा आलेख उंचावला, गुणतालिकेत भारतीय संघाचा दबदबा स्पष्ट दिसला. सलामीवीर आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.


सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शुक्रवारी सुपर-४ मधील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला हरवले. भारताने सुरुवातीला फलंदाजी केली. श्रीलंकेच्या संघाने सुद्धा भारताला कडवी झुंज दिली. दरम्यान २० षटकांत भारताने २०२ धावांचा डोंगर उभारला. पण त्यांना लक्ष्य गाठताना दमछाक झाली. सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकला पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने आशिया कप २०२५ मध्ये विजयी घोडदौड कायम ठेवली. भारतीय संघाला या सामन्यात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण अंतिम सामन्यात जेव्हा भारत पाकिस्तान संघ आमने-सामने आले आहेत, तेव्हा पाकिस्तानचे पारडे जड राहिलं आहे.



पाकिस्तानला लोळवण्याची सुवर्णसंधी


पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कपवर भारताने बहिष्कार घालण्याची मागणी होत होती. पण भारत नसला तर व्यावसायिक मोठे नुकसान होते. त्यामुळे हे सामने खेळवले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. गेल्या दोन सानन्यांनंतर भारतात कुठेही मोठा जल्लोष दिसला नाही. मात्र भारताकडे आज पाकिस्तानला पुन्हा लोळवण्याची संधी चालून आली आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यात पाक संघाला नामोहरम केले, आता अंतिम सामन्यात पाक संघाला त्याच्या गर्वासह लोळवा असा संताप भारतीय चाहत्यांचा आहे.


इंडिया 'सुपर ४ गुणतालिकेत सर्वांत आघाडीवर आहे. आशिया चषकात ६ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. तर दोन सामने जिंकणारा पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता अंतिम सामन्यासाठी पुन्हा पाकिस्तानसोबत भारताचा सामना होणार आहे. आशिया कपमध्ये हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.


Comments
Add Comment

IPL 2026 CSK vs DC : अखेर चेन्नईच्या विजयाचा श्रीगणेशा झालाच! संजू सॅमसन ठरला या हंगामातील पहिला शतकवीर

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ मधील १८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध जोरदार पुनरागमन करणार ?

मुंबई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात पुन्हा एकदा संथ सुरुवात झाल्यानंतर, मुंबई इंडियन्स आता आपल्या परिचित आणि

IPL 2026 Points Table : १५ सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स टॉपवर; हे ४ संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आघाडीवर

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १५ सामने पूर्ण झाले असून स्पर्धा आता रंगात आली आहे. काही संघ जबरदस्त

IPL 2026 Wanindu Hasaranga : लखनऊची डोकेदुखी वाढली! स्टार स्पिनर हसरंगा उर्वरित स्पर्धेतून बाहेर

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन