IND vs SL: अर्शदीपची कमाल, सुपरओव्हरमध्ये भारताचा श्रीलंकेवर विजय

दुबई:आशिया कप २०२५मधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला होता. मात्र सुपर ओव्हरमध्ये भारताने बाजी मारली आणि सामना जिंकला. श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये २ विकेट गमावत केवळ दोन धावा केल्या होत्या. अर्शदीपच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज काहीच करू शकले नाहीत. त्यानंतर भारताने केवळ एकाच बॉलमध्ये ३ धावा करत सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेवर मात केली आणि सामना जिंकला.


भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक त्यानंतर तिलक शर्माच्या जबरदस्त धावांच्या जोरावर २०२ धावा केल्या होत्या.  हे आव्हान सुरूवातीला मोठे वाटत होते. मात्र श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका आला आणि त्याने जबरदस्त खेळीला सुरूवात केली.


त्याने या सामन्यात शानदार शतक ठोकत १०७ धावा केल्या. त्याच्या जोरावर श्रीलंकेचे फलंदाज शेवटपर्यंत लढले मात्र काही धावांनी त्यांना हा सामना गमवावा लागला. श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निसांकाने जबरदस्त १०७ धावांची खेळी केली. ५८ बॉलमध्ये ७ चौकार आणि ६ षटकांरांच्या जोरावर त्याने ही खेळी साकारली.



अशी होती भारताची खेळी 


या सामन्यात पहिल्यांदा धक्का बसला तो शुभमन गिलच्या रूपाने. शुभमन गिल अवघ्या ४ धावा करून बाद झाला. सलामीवीर अभिषेक शर्माचा जबरदस्त फॉर्म या सामन्यातही पाहायला मिळाला. त्याने ३१ बॉलमध्ये ६१ धावांची तुफानी खेळी केली. सूर्याही या सामन्यात चमकदार खेळी करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून केवळ १२ धावा निघाल्या. संजू सॅमसनने ३९ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या केवळ २ धावा करू शकला. अक्षर पटेल २१ तर तिलक वर्मा ४९ धावांवर नाबाद राहिले.


भारतीय संघ याआधी आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तेथे त्यांचा सामना रविवारी पाकिस्तानशी होणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाचे मात्र फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले.


भारताचे प्लेईंग ११


अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि वरूण चक्रवर्ती.


श्रीलंकेचे प्लेईंग ११


पथुम निसंका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, चरिथ असंलका(कर्णधार), जेनिथ लियानागे, कमिंदू मेंडिस, दासुन शनाका, वनिंदु हसारंगा, दुष्मंथा चमिरा, महीश तीक्ष्णा, नुवान तुषारा.

Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच