झुबीन गर्गच्या निधनानंतर मॅनेजर सिद्धार्थ शर्माने सोडले मौन!

मुंबई : प्रसिद्ध गायक झुबीन गर्गच्या निधनानंतर काही दिवसांनी त्याचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा याने मौन सोडत एक भावनिक आणि स्पष्ट विधान केले आहे. त्याने झुबीनच्या आर्थिक व्यवहारांबाबत आणि त्याच्या मृत्यूनंतर पसरत असलेल्या अफवांबाबत स्पष्टीकरण दिले.


झुबीन सिंगापूरमध्ये होणाऱ्या नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता, तिथेच स्कुबाडायविंग करताना त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. झुबीनच्या निधनानंतर आसामसह देशभरात त्याच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला.


गर्गच्या मृत्यूनंतर त्याचा मॅनेजर सिद्धार्थ शर्माने एक विधान केले आहे. हे विधान झुबीन गर्गच्या गुवाहाटीतील दातालपारा परिसरातील घरावर विशेष तपास पथक (SIT) ने छापा टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समोर आले. शर्मा याने स्पष्ट केले की त्याचे हे वक्तव्य चाहत्यांना चुकीच्या माहितीपासून दूर ठेवण्यासाठी आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी उघडपणे सांगितले की झुबीन गर्गने गायलेली जवळपास ३८,००० गाणी ही मुख्यत्वेकरून वेगवेगळ्या म्युझिक लेबल्स आणि प्रॉडक्शन कंपन्यांच्या मालकीची आहेत. "गर्ग दा यांची बहुतेक प्रसिद्ध गाणी, अगदी सुपरहिट चित्रपटातील गाणी देखील, मी त्यांच्यासोबत काम करण्याच्या आधीच तयार झाली होती. त्यांनी अनेकदा व्यक्त केले की, निर्मात्यांना खूप कमी मोबदला मिळतो आणि त्याच गाण्यांवरून कंपन्या कोट्यवधींची कमाई करतात,"


झुबीनने २०२१ मध्ये ‘झुबीन गर्ग म्युझिक एलएलपी’ या कंपनीची स्थापना केली होती, ज्यामध्ये शर्मा हे देखील भागीदार आहे. मॅनेजर शर्माच्या म्हणण्यानुसार, या कंपनीने फारशी कमाई केली नाही आणि कंपनीतील सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक असून तिचे खाते स्वतंत्र व क्लिअर आहे.


या कंपनीत झुबीन गर्गचा ६०% हिस्सा होता आणि तो त्याच्या कुटुंबाला, विशेषतः त्याची पत्नी गरिमा गर्ग यांना मिळणार असल्याची माहिती मॅनेजर शर्माने दिली. शिवाय, झुबीन गर्गला मिळणाऱ्या रॉयल्टी थेट त्याच्या वैयक्तिक खात्यात जमा होत असे आणि आता ती रक्कम गरिमा गर्ग यांच्या नावावर हस्तांतरित केली जात आहे.


सिद्धार्थ शर्माने गर्गच्या मृत्यूनंतर लावण्यात येणाऱ्या आर्थिक शोषणाच्या आरोपांना फेटाळत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. "तपास पूर्वग्रह न ठेवता होऊ द्या. झुबीन दा यांच्या स्मृतीचा सन्मान राखण्यासाठी आपण सत्याचा शोध घ्यायलाच हवा," असे सिद्धार्थने म्हटले.


Comments
Add Comment

‘धुरंधर’चा रनटाईम १८५ मिनिटे ? रणवीरच्या कारकिर्दीतील सर्वात लांब चित्रपट

मुंबई : धुरंधरच्या ट्रेलरने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. हा ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी लाँच

बॉलीवूडचे खलनायक प्रेम चोप्रांची तब्येत स्थिर, लीलावती रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा यांची तब्येत बरी नव्हती. वयानुसार

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने