राज्यातील दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांची बदली


मुंबई : महाराष्ट्रात लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. मागच्या महिन्यात राज्यातील सात आयएएस बदल्या झाल्या. नंतर दोनच दिवसांपूर्वी चंद्रकांत डांगे आणि प्रवीण पुरी यांची बदली करण्यात आली. आता विनिता वैद सिंघल आणि सोनिया सेठी यांची सुद्धा बदली करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून नऊ महिन्यांत राज्यातील अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यात आयएएस, आयपीएस आणि पोलीस दलात बदल्या करण्यात आल्या आहेत.


आयएएस अधिकारी विनिता वैद सिंघल या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव होत्या. आता आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातच त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. पण १७ एप्रिल रोजी त्यांची बदली झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांची अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे. आयएएस अधिकारी विनिता वैद सिंघल ह्या १९९६ बॅचच्या महाराष्ट्रातील एक वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या विनिता यांनी इंग्रजी साहित्यात एमए केलेले आहे. त्यांनी यापूर्वी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे.


आयएएस अधिकारी सोनिया सेठी महसूल आणि वन विभागात मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव म्हणून कार्यरत होत्या. आता त्या मुंबईत बेस्ट विभागाच्या महाव्यवस्थापक म्हणून काम बघतील. डॉ. सोनिया सेठी या महाराष्ट्र केडरच्या १९९४ बॅचच्या एक वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. केली आहे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमए आणि एमबीए केले आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मध्ये अतिरिक्त महानगर आयुक्त आणि राज्य शासनाच्या नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून काम केले होते.


Comments
Add Comment

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि