Pharma Stock in Focus: टॅरिफ फटक्यामुळे Pharma शेअर्समध्ये प्रचंड मोठी घसरण,तज्ञ काय म्हणतात जाणून घ्या बाजारातील स्थिती...

मोहित सोमण:युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथसोशल मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटवरील जाहीर केलेल्या फार्मास्युटिकल उत्पादनावर १००% टॅरिफ लावण्याचा निर्णय काल उशीरा घेतला आहे. त्यामुळेच त्यांचे पडसाद आज शेअर बाजारात पडत आहेत. वि शेषतः फार्मा, हेल्थकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये यांचे सर्वाधिक पडसाद उमटले. सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलातच वोक्हार्ट (६.५०%), कँपलिन लॅब्स (५.१८%), वारी एनर्जीज (५.०२%), लारूस लॅब्स (४.४०%), नाटको फार्मा (५.०७%),अजांता फार्मा ( ३.५१%), होनसा कंज्यूमर (३.४६%), डिवीज लॅब्स (२.९७%), इपका (IPCA) लॅब्स (२.९२%), सनफार्मा (२.९८%), झायडस लाईफसायन्स (३.१७%), सिप्ला (०.६०%) शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.


भारतासाठी युएस बाजार हे फार्मास्युटिकल उत्पादनाचे सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे फार्मा कंपनीच्या एकूण महसूल उत्पन्नातील ४०% पर्यंत वाटा हा फार्मा निर्यातीवर अवलंबून आहे. विशेषतः सर्वात जास्त निर्यात युएस बाजारात केली जाते. अमेरिका लो कोस्ट जेनेटिक औषधे भारताकडून आयात करते अथवा युएस पेंटट आधारित भारतीय उत्पादनाची आयात करते. अशा परिस्थितीत तज्ञांचे म्हणणे आहे की जेनेरिक औषधे कमी मार्जिनवर चालतात आणि जर टॅरिफ लावले असते तर त्यामुळे उत्पादनात व्यत्यय आला असता आणि अमेरिकेत तुटवडा निर्माण झाला असता. तथापि, ही सूट आज प्रमुख भारतीय औषध साठ्यांना गंभीर परिणामांपासून वाचवते. युएस बाजारात कंपन्यांना उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ही घोषणा करण्यात आली आहे. मुख्य ब्रँ डेड औषधांवर हे शुल्क वाढवले गेले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी औषध निर्मिती अमेरिकेत परत आणण्याची गरज अधोरेखित केली आणि म्हटले आहे की,'आम्हाला चीनमध्ये बनवलेली जीवनरक्षक औषधे आणि औषधे हवी आहेत की अमेरिकेत? हे एक सामान्य धोरण आहे.'विश्लेषकांचे म्हणणे आहे की या शुल्काचा प्रामुख्याने ब्रँडेड औषधांवर परिणाम होईल, तर भारतातून निर्यात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर कर सवलत राहील. त्यामुळे जेनेरिक औषधे या संकटातून वाचणार आहेत. यु एस राष्ट्राध्यक्ष यांनी ट्रूथ सोशल नेटवर्कर ही घोषणा केली होती.


ज्यामध्ये त्यांनी युएसमध्ये उत्पादन निर्मिती प्रकल्प नसल्यास १००% टॅरिफला सामोरे जाण्याचा इशारा दिला ते म्हणाले होते की,' १ ऑक्टोबर २०२५ पासून, आम्ही कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषध उत्पादनावर १००% कर लादणार आहोत, जोपर्यंत ए खादी कंपनी अमेरिकेत त्यांचा औषध उत्पादन प्रकल्प बांधत नाही. "IS BUILDING" ची व्याख्या "ब्रेकिंग ग्राउंड" आणि/किंवा "बांधकामाधीन" अशी केली जाईल. म्हणून, जर बांधकाम सुरू झाले असेल तर या औषध उत्पादनांवर कोणताही कर लागू होणार नाही. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद' असे म्हणत त्यांनी पोस्ट केली आहे.


यापूर्वी जुलैच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की औषध कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांवर २००% पर्यंत शुल्क लावण्यापूर्वी त्यांचे कामकाज अमेरिकेत आणण्यासाठी काही मोकळीक देण्याचा त्यांचा हेतू आहे. १५ जुलै रोजी त्यांनी सांगितले की ते महिन्याच्या अखेरीस औषधांवर शुल्क लादण्यास सुरुवात करतील. जुलैच्या अखेरीस, अमेरिका आणि युरोपियन युनियनने एक व्यापक व्यापार करार केला ज्यामध्ये औषध उत्पादनांवर १५% शुल्क समाविष्ट होते. नुकताच बायोकॉनने अलीकडेच अमेरिकेत एक प्लांट सुरू केला आहे ज्यामुळे त्याला टॅरिफपासून संरक्षण मिळाले असून शुल्क माफ होऊ शकते. तर अतिरिक्त स्थानिक उत्पादन स्थापित न झाल्यास मात्र सन फार्माला काही धोका निर्माण होऊ शकतो. या बातमीमुळे सन फार्माच्या स्टॉक बातम्या आणि बायोकॉनच्या यू एस प्लांट संबंधित घडामोडी गुंतवणूकदारांसाठी प्रकाशझोतात आल्या आहेत.


आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ३.७ अब्ज डॉलरची निर्यात भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांनी केली होती.सन फार्मा, डॉ रेड्डीज, लुपिन, अरबिंदो अशा बड्या कंपन्याचा या निर्यातीत मोठा सहभाग असतो. लो कोस्ट जेनेटिक औषधे युएस बाजारात निर्यात करण्यात या कं पन्यांचे योगदान असते. यातूनच आता आधीच ५०% अतिरिक्त शुल्कासह फार्मा उत्पादनावर १००% टॅरिफ लावल्याने यांचे पडसाद आजच्या बाजारातही अपेक्षित आहेत. त्यामुळे या शेअर्समध्ये दिवसभरात फोकस करणे गुंतवणूकदारांसाठी आवश्यक असेल. स काळी १०.२१ वाजेपर्यंत सनफार्मा (२.४२%), सिप्ला (०.८१%), डॉ रेड्डीज (०.८१%), लुपिन (१.००%), अरबिंदो फार्मा (०.९९%), झायडस लाईफसायन्स (२.९५%), अलेकम लॅब्स (०.८७%), ग्लेन मार्क फार्मा (२.१३%) शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.


आजच्या या घसरणीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'पेटेंट आणि ब्रँडेड औषधांवर नवीन कर लादण्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा टॅरिफचा राग पुन्हा सुरू होत आहे. जेनेरि क औषधांचा निर्यातदार असल्याने भारतावर याचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.परंतु कदाचित राष्ट्रपतींचे पुढील लक्ष्य जेनेरिक औषधे असू शकतात. या निर्णयाचा औषधांच्या साठ्यावर भावनिक परिणाम होऊ शकतो.ट्रम्प आता देश-विशिष्ट टॅरिफव रू न उत्पादन-विशिष्ट टॅरिफकडे वाटचाल करत आहेत. ट्रक,अपहोल्स्टर्ड फर्निचर इत्यादींवरील उच्च शुल्क हे सूचित करते की ट्रम्प प्रशासनाकडून टॅरिफचे शस्त्रीकरण सुरू राहिल्याने अमेरिकेतील महागाई वाढून या धोरणाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले जा त नाही तोपर्यंत चालू राहू शकते.निरंतर FII विक्रीमुळे बाजारावर दबाव येऊ शकतो. गुंतवणूकदार उच्च दर्जाचे स्टॉक हळूहळू जमा करण्यासाठी घसरणीचा वापर करू शकतात, विशेषतः जे देशांतर्गत वापरामुळे चालतात.'

Comments
Add Comment

Snake Spotted Polling Station : चेंबूरमधील मतदान केंद्रात विषारी सापाचं दर्शन! सुरक्षा रक्षकांमध्ये भीतीचं वातावरण; थेट आला अन्...

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी चेंबूर परिसरातील

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

७५ देशातील स्थलांतरितांसाठी ट्रम्प ठरले कर्दनकाळ! ७५ देशांना अनिश्चित काळासाठी व्हिसाबंदी जाहीर

प्रतिनिधी: कायम अमेरिका फर्स्ट अशी आवई देणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या बेकायदेशीर परदेशी

आरबीआयकडून जपानच्या दिग्गज सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला भारतात बँकिंग व्यवसायासाठी मान्यता

मोहित सोमण: आरबीआयने सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (SMBC) या जापनीज कंपनीला भारतात बँकिग व्यवसायासाठी आपली

Tejasvee Ghosalkar : मतदानाच्या दिवशी तेजस्वी घोसाळकर भावूक! आज शारीरिकदृष्ट्या अभिषेक सोबत नसले, तरी...

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असताना, दहिसरमधील वॉर्ड क्रमांक २ मध्ये एक अत्यंत