IND vs PAK: आम्ही टीम इंडियालाही हरवू शकतो...बांगलादेशला हरवल्यानंतर पाकच्या कर्णधाराने दिले चॅलेंज

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशचा ११ धावांनी पराभव करून पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि आता त्यांचा सामना भारताशी होणार आहे. पाकिस्तानचे कर्णधार सलमान आगा यांनी भारताला हरवण्यासाठी एक विशेष योजना तयार केली असून, आपल्या संघावर त्यांना पूर्ण विश्वास आहे.


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली असली तरी, त्यानंतर मधल्या फळीतील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून धावसंख्या वाढवली. मोहम्मद हारिस (३१), मोहम्मद नवाज (२५) आणि शाहीन आफ्रिदी (१९) यांनी केलेल्या महत्त्वाच्या खेळीमुळे संघ १३५ धावांपर्यंत पोहोचला. या प्रदर्शनाने त्यांची फलंदाजीची खोली दर्शविली आहे.


पाकिस्तानची खरी ताकद त्यांच्या वेगवान गोलंदाजीत आहे. शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफ यांनी बांगलादेशविरुद्ध प्रत्येकी तीन विकेट्स घेत त्यांची फलंदाजी मोडीत काढली. भारताला हरवण्यासाठी त्यांच्या वेगवान गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.



सलमान आगाचा आत्मविश्वास


कर्णधार सलमान आगाने संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "आमच्या संघात काही विशेष खेळाडू आहेत, जे भारताला पराभूत करण्यासाठी पुरेसे आहेत. आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत आणि फायनलमध्ये चांगली कामगिरी करू."


आशिया कपच्या इतिहासात ४१ वर्षांनी पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघ या स्पर्धेत दोनदा आमनेसामने आले होते आणि दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.


अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा एक मोठा महामुकाबला असणार आहे.

Comments
Add Comment

महिला विश्वचषक : सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला विजय आवश्यक

नवी मुंबई : २०२५ महिला विश्वचषक एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत फक्त एकच स्थान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर कमबॅकचे आव्हान

कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाचा दुसरा मुकाबला ऍडलेड ओव्हल येथे रंगणार आहे. पहिला एकदिवसीय सामना

एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तीन संघाची लागणार ताकद, भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान

मुंबई: क्रिकेट विश्वातील एकदिवसीय महिला विश्वचषकच्या यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने पार पडले आहेत. हा

ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी

नवी दिल्ली : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला बुधवारी भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल या मानद

आशिया कप ट्रॉफीवरून रणसंग्राम: BCCI vs नक्वी, ट्रॉफीचा तिढा सुटत नाही!

नवी दिल्ली : आशिया कप 2025 ची ट्रॉफी सध्या एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आशियाई

IND vs AUS: कर्णधार शुभमन गिलचा मोठा डाव; 'या' धुरंधराची एंट्री निश्चित! ऑस्ट्रेलिया संघातही मोठे बदल

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ, विशेषतः अ‍ॅडलेड येथे होणाऱ्या