टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): गेल्या काही दिवसांपासून मत्तचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगाला सातत्याने लक्ष्य करत आहेत. पादरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीबाबतच्या नियमामध्ये बदल केला आहे.


आता ईव्हीएम आणि व्हीहीपॅटमधील मतांच्या मोजणीचा दुसरा आणि अंतिम टप्पा हा पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू होईल. याआधी ईव्हीएममधील मतांची मोजणी ही पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होण्यापूवीही पूर्ण होऊ शकत असेल. हा बदल पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला आहे.


मतदानादिवशी पोस्टल वंलेटची मतमोजणी ही सकाळी ८ वाजता सुरू होते, तर ईव्हीएमची मोजणी ही ८.३० वाजता सुरू होते. आधी ईव्हीएमची मोजणी ही पोस्टल बॅलेटच्या मोजणीच्या कुठल्याही टप्प्यात सुरू राहत असे. तसेच ती आधी पूर्ण होण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नव्हती. दरम्यान, आता ईव्हीएम/व्हीव्हीपॅटच्या मोजणीचा दुसरा टप्पा हा पोस्टल बॅलेटमधील मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू होईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.


मतमोजणी प्रक्रियेमध्ये एकरूपता आणि अधिकाधिक स्पष्टता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. जिथे पोस्टल बॅलेटची मतमोजणी केली जाते विशेष करून तिथे हा बदल लागू केला जाणार आहे.

Comments
Add Comment

टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगाला

पंतप्रधानांनी केली अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी

बांसवाडा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या या आदिवासी-बहुल प्रदेशात २८०० मेगावॅटच्या अणुऊर्जा

ऐन दिवाळीत साखरेचे भाव वाढणार

नवी दिल्ली : ऐन दसरा, दिवाळीत साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने यंदाचा देशांतर्गत साखर

रील बनवणे पडले महागात, पाच जणांचा बुडून मृत्यू

पाटणा : बिहारमधील गयाजी येथे गुरुवारी (२५ सप्टेंबर) एक मोठी दुर्दैवी घटना घडली. खिजरसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत

हवाई दलाला मिळणार ९७ स्वदेशी लढाऊ विमाने; संरक्षण मंत्रालयाने एचएएलशी केला ६२,३७० कोटींचा करार

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच ९७ अत्याधुनिक ‘तेजस मार्क-1ए’ लढाऊ विमाने दाखल होणार आहेत. केंद्र

तरुणाचं ऑपरेशन, पोटातून काढल्या या वस्तू; डॉक्टर पण चक्रावले

हापूड : उत्तर प्रदेशमधील हापूड येथे एक तरुण पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार सांगत डॉक्टरांकडे आला.