छत्तीसगड : स्टील प्लांटचे छत कोसळून ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

रायपूर : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आज, शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. सितलारा येथे असलेल्या गोदावरी स्टील प्लांटमध्ये छत कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

यासंदर्भातील प्राथमिक माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथे अनेक कामगार काम करत होते. अचानक प्लांटमधील छताचा भाग कोसळल्यामुळे अनेक कामगार त्याखाली अडकले. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील अनेक जखमींना रायपूरच्या देवेंद्र नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, पिलेट्स बनवणाऱ्या युनिटमध्ये हा अपघात झाला असून, निर्माणाधीन भाग कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ज्या भागात ही घटना घडली त्या ठिकाणी 12 ते 14 कामगार उपस्थित होते.

या घटनेवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय म्हणाले की, आत्ताच मला घटनेची माहिती मिळाली आहे. लोकांचा मृत्यू झाल्याचे ऐकून मला खूप दुःख झाले आहे. काही लोक गंभीर जखमी असल्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मदत आणि बचावकार्य राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

लडाखमधील हिंसाचार प्रकरणी सोनम वांगचुकला अटक

लेह : लडाख या केंद्रशासित प्रदेशाला भारतीय संविधानातील कलम सहा (आर्टिकल सिक्स) अंतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा

भारतात हृदयविकार आणि स्ट्रोकचे प्रमाण का वाढले? पहा काय म्हणाले जागतिक तज्ज्ञ

भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीज होण्‍याचा धोका 'एलीव्‍हेटेड लिपोप्रोटीन(ए)'कडे

पंतप्रधान मोदींचा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र दौरा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ आणि नऊ ऑक्टोबर असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मेट्रो ३ च्या अंतिम

बाथरूममध्ये सापडल्या ४० मुली! बेकायदेशीर मदरशाचे छांगूर बाबाशी कनेक्शन

लखनऊ : लखनऊजवळील बहराईच जिल्ह्यातील पयागपूर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक प्रशासनाने बुधवारी

कोणावर अवलंबून राहणे परवडणारे नाही

पंतप्रधान मोदी यांचे स्वाबलंबी बनण्याचे आवाहन; नोएडात आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन नोएडा :

टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगाला