Friday, September 26, 2025

छत्तीसगड : स्टील प्लांटचे छत कोसळून ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

छत्तीसगड : स्टील प्लांटचे छत कोसळून ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

रायपूर : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आज, शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. सितलारा येथे असलेल्या गोदावरी स्टील प्लांटमध्ये छत कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यासंदर्भातील प्राथमिक माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथे अनेक कामगार काम करत होते. अचानक प्लांटमधील छताचा भाग कोसळल्यामुळे अनेक कामगार त्याखाली अडकले. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील अनेक जखमींना रायपूरच्या देवेंद्र नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, पिलेट्स बनवणाऱ्या युनिटमध्ये हा अपघात झाला असून, निर्माणाधीन भाग कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ज्या भागात ही घटना घडली त्या ठिकाणी 12 ते 14 कामगार उपस्थित होते. या घटनेवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय म्हणाले की, आत्ताच मला घटनेची माहिती मिळाली आहे. लोकांचा मृत्यू झाल्याचे ऐकून मला खूप दुःख झाले आहे. काही लोक गंभीर जखमी असल्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मदत आणि बचावकार्य राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment