गडचिरोलीतील भामरागडला यंदाच्या वर्षी पाचव्यांदा पुराचा फटका


गडचिरोली : मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असतानाच विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही पुराचा जबर फटका बसला आहे. यंदाच्या वर्षी भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसला आहे. यावेळी भामरागड तालुक्यातील १०५ गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद आहे.


पुराचा तडाखा बसलेल्या मराठवाड्याला राज्य शासनाने २२१५ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही पुराचा तडाखा बसला आहे. यंदाच्या वर्षी भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसला आहे. भामरागड तालुक्यातील १०५ गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) पाण्याखाली गेल्यामुळे या रस्त्यावरुन होणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प आहे.


पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर पाणी चढले. यामुळे, आल्लापल्लीभामरागड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महसूल व पोलीस विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेटस लावून बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाच्या बसगाड्या तसेच खासगी वाहने पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून पडली आहेत. नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांची गैरसोय झाली आहे.


Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या