डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ बॉम्ब फार्मा उत्पादनावर अतिरिक्त १००% टॅरिफवाढ लागू, इतर वस्तूवरही टॅरिफ वाढवले 'भारतीय कंपन्यावर होणार 'हा' मोठा परिणाम

प्रतिनिधी:आणखी एक टॅरिफ बॉम्ब डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला आहे. आणखी एक टॅरिफची वाढ केल्याने बाजारात हल्लकल्लोळ अपेक्षित आहे. आज ट्रम्प यांनी फार्मा उत्पादनावर १००%, कि चन कॅबिनेटवर व बाथरूम व्हॅनिटीवर ५०%, फर्निचरवर ३०%, व अवजड ट्रक्सवर २५% टॅरिफ जाहीर केला आहे. त्यामुळे हे नवे दर १ ऑक्टोबरपासून लागू होतील. ट्रुथसोशल या मायक्रो ब्लॉगिं ग साईटवर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ट्रम्प यांनी ही धमकी दिली होती. अखेर नवे दर लागू झाली आहे. यापूर्वी १५०%,२००% टॅरिफ फार्मा उत्पादनावर सुरु होती मात्र यापूर्वी सद्यस्थितीत फार्मा उत्पादनावर वाढीव शुल्क नसल्याने दिलासा मिळाला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मात्र फार्मा उत्पादनावर शुल्क वाढवून उद्योगविश्वाला हा दरा दिला.


माहितीनुसार, १ ऑक्टोबरपासून हे दर लागू होणार आहेत. तसेच फार्मास्युटिकल उत्पादनातील ब्रँडेड औषधांच्या अथवा पेटंट असलेल्या कंपन्यांना हे दर लागू होतील. केवळ या कंपन्यांचे उत्पाद न निर्मिती प्रकल्प (Manufacturing Plant) युएसमध्ये नसतील तर हे लागू होतील. असल्यास यातून सूट मिळू शकते. जर कंपन्यानी यापूर्वीच आपले प्रकल्प बांधण्यास सुरुवात केली असेल तरी हे शुल्क लागू होणार नाही.


'१ ऑक्टोबर २०२५ पासून, आम्ही कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषध उत्पादनावर १००% कर लादणार आहोत, जोपर्यंत एखादी कंपनी अमेरिकेत त्यांचा औषध उत्पादन प्रकल्प बांधत नाही."IS BUILDING" ची व्याख्या "ब्रेकिंग ग्राउंड" आणि/किंवा "बांधकामाधीन" अशी केली जाईल. म्हणून, जर बांधकाम सुरू झाले असेल तर या औषध उत्पादनांवर कोणताही कर लागू हो णार नाही. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद' असे म्हणत त्यांनी ट्रुथ सोशलवर वरील घोषणा पोस्ट केली आहे.अमेरिकेतील जवळपास ९०% बायोटेक कंपन्या त्यांच्या मंजूर उत्पादनांपैकी किमान अर्ध्या उत्पादनांसाठी आयात केलेल्या घटकांवर अवलंबून असतात असे म्हटले जाते.एप्रिलमध्ये, ट्रम्प प्रशासनाने सर्व औषध आयात - तयार जेनेरिक आणि ब्रँडेड औषधे तसेच ते बनवण्या साठी वापरल्या जाणाऱ्या घटकांचा - अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होणाऱ्या परिणामांची चौकशी सुरू केली.


जुलैच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की औषध कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांवर २०० टक्के पर्यंत शुल्क लावण्यापूर्वी त्यांचे कामकाज अमेरिकेत आणण्यासाठी काही मोकळीक देण्याचा त्यांचा हेतू आहे. १५ जुलै रोजी त्यांनी सांगितले की ते महिन्याच्या अखेरीस औषधांवर शुल्क लादण्यास सुरुवात करतील. जुलैच्या अखेरीस, अमेरिका आणि युरोपियन युनियनने एक व्यापक व्यापा र करार केला ज्यामध्ये औषध उत्पादनांवर १५ टक्के शुल्क समाविष्ट होते.


भारतावर काय परिणाम अपेक्षित?


फार्मा कंपन्यांसाठी अमेरिका हे सर्वात मोठे बाजार आहेत. नवा निर्णय या कंपन्यांच्या अर्थकारणावर परिणाम करणारा ठरेल. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ३.७ अब्ज डॉलरची निर्यात भारतीय फार्मा स्युटिकल कंपन्यांनी केली होती. सन फार्मा, डॉ रेड्डीज, लुपिन, अरबिंदो अशा बड्या कंपन्याचा या निर्यातीत मोठा सहभाग असतो.लो कोस्ट जेनेटिक औषधे युएस बाजारात निर्यात करण्यात या कं पन्यांचे योगदान असते. यातूनच आता आधीच ५०% अतिरिक्त शुल्कासह फार्मा उत्पादनावर १००% टॅरिफ लावल्याने यांचे पडसाद आजच्या बाजारातही अपेक्षित आहेत.

Comments
Add Comment

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

नंदुरबार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

बंदी असलेल्या गांजा आणि चायनीज मांजाची पुण्यात राजरोस विक्री

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आणि त्यांच्या आसपासच्या भागात बंदी असलेल्या गांजा या

शरद पवारांच्या पक्षाला भगदाड, शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा राजीनामा

पुणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान